जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आंदोलन

गणेशच्या दडपशाही विरुद्ध शेतकरी संघटना लढणार-ऍड.काळे

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा


कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

दडपशाही विरुद्ध शेतकरी संघटना लढणार असून शेतकरी हित पुढे ठेवूनच शेतकरी संघटना अनेक दशके कार्यरत असून आगामी काळात हा लढा सुरू ठेवणार गणेश कारखान्यात सुरू असलेल्या कोणाच्या दडपशाहीला भीक घालणार नाही असा इशारा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांनी गणेशनगर येथील कारखाना परिसरात सायंकाळी ०७ वाजता बोलताना दिला आहे.

“सहकारात आयुक्त म्ह्णून शेखर गायकवाड सारखा माणूस जो पर्यंत साखर आयुक्त पदावर आहे तो पर्यंत शेतकऱ्यांचे बळी जात राहतील.अशी टीका केली आहे.प्रशासन आणि अधिकारी चुकीचे अहवाल देत असतील तर तर गैरव्यवहार होतच राहणार असून शेतकऱ्यांना वेठबिगार बनवणारी सहकारी चळवळ आपल्याला बदलावी लागणार आहे”-ऍड.अजित काळे,उपाध्यक्ष,प्रदेश शेतकरी संघटना.

राहाता तालुक्यातील शेतकऱ्यांची कामधेनू समजल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा पंचवार्षिक निवडणूकीस आता रंग भरू लागला असून १९ जागांसाठी हि निवडणूक आगामी १७ जून रोजी संपन्न होत असून आलेल्या एकूण १०६ पैकी नामनर्देशन पत्रापैकी १३ अवैध झाले असताना दाखल असलेले अर्ज इच्छुकांना २३ मे ते ०६ जून या दरम्यान मागे घेण्याची अंतिम मुदत असताना या निवडणुकीला एक गंभीर वळण प्राप्त झाले असून यात दि.३१ मे रोजी रोजी गणेश कारखाना परत एकदा डॉ.विठ्ठलराव विखे (प्रवरा)सहकारी कारखान्यास चालवण्यासाठी गणेशच्या मुदत संपलेल्या संचालक मंडळा कडून धक्कादायक पद्धतीने करार केला आहे.त्यामुळे गणेशच्या सभासदांत खळबळ उडाली आहे.या निर्णयाने आगामी काळातील लोकशाहीच्या चाकोरीतील हुकूमशाही आता स्पष्ट दिसू लागली आहे.त्यामुळे शेतकरी संघटनेने या विरुद्ध ‘बंड’ पुकारले असून त्यासाठी दि.०३ जून रोजी सायंकाळी ०५ वाजता कारखाना प्रवेशद्वाराच्या समोर शेतकरी आणि सभासद आदींची,’जाहीर सभा’ आयोजित केली होती त्यावेळी त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी लहारे हे होते.

दरम्यान आज गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या सभेस कार्यक्षेत्रातील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित असल्यांने सत्ताधारी विखे गटाविरुद्ध मोठी नाराजी दिसून आली असून त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसणार असे चित्र दिसून आले आहे.

सदर प्रसंगी गणेश सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष ऍड.नारायण कार्ले,परिवर्तन विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर,अरुण कडू,एकनाथ घोगरे,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे,कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब बोटे,डांगे सर,कामगार नेते रमेश देशमुख,नानासाहेब गाढवे,शिवाजी जगताप,सुरेश थोरात,आदी मान्यवरासह मोठ्या संख्येने सभासद व शेतकरी उपस्थितीत होते.

गणेश कारखान्याचा तिसरा करार सभासदांना विश्वासात न घेता केल्याने त्याची मोठी नाराजी आजच्या सभेत दिसून आल्याने सत्ताधारी गटास त्याचा मोठा हादरा बसणार असल्याची चर्चा उपस्थितांत होती.

त्यावेळी ते पुढे बोलताना म्हणाले की,”गणेश कारखान्याचा करार एकतर्फी केला गेला.३३.३३ कोटींचा ०८ वर्षासाठी असताना तो पाळला गेला नाही.तो तोटा ११० कोटींवर नेऊन ठेवला आहे.इतर देणी मिळून हा २०० कोटींवर नेऊन ठेवला आहे.राज्यात ८०टक्क्यांपेक्षा जास्त कारखाने गैरव्यवहाराने ग्रस्त आहे.याला सभासद जबाबदार आहे.त्यांनी या गैरव्यवहाराकडे दुर्लक्ष करत आहे त्यांनी जागृत राहिले पाहिजे.९०० कोटींनी प्रवरा तोट्यात असताना ते २३०० रुपये टनाला भाव देत असतील तर गणेशाचा तोटा किमान पातळीवर आहे त्यांच्या पेक्षा जास्त दर ऊस उत्पादकाला देता येईल असा विश्वास व्यक्त केला आहे.तुम्ही कशाचे दडपण बाळगता समजत नाही तुम्ही यातून बाहेर पडले पाहिजे.काही कारखाने २०० कि.मी.अंतरावरून ऊस आणून तोच भाव देतात आणि स्थानिक ऊस उत्पादकाला तोच भाव हा काय प्रकार आहे.याचा विचार करणार आहे की नाही ? यांच्या सहकारी आणि खाजगी बँका तोट्यात का जात नाही याचा तुम्ही विचार करणार नाही का ? यात मोठी गडबड आहे.प्रवराचा तोटा इकडे कसा माथी मारता असा सवाल त्यांनी विचारला आहे.

‘राहुरी सह तीन सहकारी कारखान्यांची मंत्री विखे यांनी वाट लावली आहे हे दुष्टचक्र आता थांबवायचे आहे.या शिवाय गणेशालचा तिसरा करार आपल्याला थांबवयाचा आहे.त्यांच्या कराराचा आम्ही खूप अभ्यास केला आहे.त्यामुळे हा करार बेकायदा आहे.त्यामुळे याविरुद्ध बंड करावे लागेल.गळीताचा तोटा १७ कोटी असताना १८.५० कोटी दाखवला आहे.१.५० कोटींचा घोळ आहे”-डॉ.एकनाथ गोंदकर,अध्यक्ष,शेतकरी विकास परिवर्तन पॅनल.

ऍड.काळे यांनी यावेळी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नक्की संपन्न होणार आहे.तुम्ही पाठीशी उभे रहा त्यासाठी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात मदत करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.आता संबंधित मंत्री गावोगाव का फिरायला लागले आहे.यापूर्वी त्यांना वेळ का नव्हता असा सवाल करून त्यांनी हा गणेश कारखान्यांचा अवैध करार रद्द केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे.कोणताही करार रद्द करण्याचा अधिकार सर्व साधारण सभेला आहे तो विसरू नका.शेतकरी संघटना आणि समोर असलेल्या नेत्यांवर विश्वास ठेवा हा कारखाना नक्की यशस्वी करू असा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिला आहे.व घरोघरी जाऊन प्रचाराला लागा असे आवाहन त्यांनी शेवटी केले व आगामी १७ जूनला प्रामाणिक कार्यकर्ते निवडून आणा तरच मोठा बदल होणार आहे.स्वतःवर विश्वास ठेवा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.

शिर्डीचे राजेंद्र गोंदकर यांनी १.३८ कोटी देऊनही तो करार यशस्वी होऊ दिले नाही.बी.व्ही.जी.चे हनुमंत गायकवाड यांनी आधी होकार भरून नंतर राजकिय दबावामुळे कर्ज नाकारले होते.२०१२-१३ ला इतर कारखान्यांना देण्याचा सभा आयोजित करून निर्णय घेतला.३३.३३ कोटीच्या देण्याची २६ मे २०१४ साली डॉ.विखे कारखान्याकडे चालविण्यास सुपूर्त केला.२०१८ ला मुदत संपला.पण २२जून २०२२ला करार संपुष्टात आला होता”-ऍड.नारायण कार्ले,माजी अध्यक्ष,गणेश सहकारी कारखाना,गणेशनगर.

सदर प्रसंगी माजी अध्यक्ष ऍड.नारायण कार्ले हे बोलताना म्हणाले की,”माजी मंत्री कोल्हे यांच्या ताब्यात हा कारखाना ताब्यात आला त्यावेळी अशीच दुरावस्था होती.२०१२ ला ताब्यात आल्यावर त्यात सुधारणा झाली.राज्य बँकेवर प्रशासक नेमला गेला अनेक कारखान्याचे कर्ज थांबवले होते.प्रक्रियेसाठी ८५ टक्के रक्कम थांबल्याने कारखान्यात अनियमितता आली असल्याची कबुली दिली आहे.त्यावेळी त्यांना विनंती केली व आर्थिक नुकसान टाळण्याचा प्रयत्न केला मात्र गोयल यांनी नकार दिला.राज्य बँकेकडे भाग १.८५ कोटी होते थोड्या रकमेची गरज होती मात्र ते सोयिस्कर रित्या टाळले गेले आहे.अन्य बँकांनी कर्ज नाकारल्याने हा कारखाना २०११ पर्यंत चांगला चालू असताना बंद पडला असल्याचे सांगितले होते.शिर्डीचे राजेंद्र गोंदकर यांनी १.३८ कोटी देऊनही तो यशस्वी होऊ दिले नाही.बी.व्ही.जी.हनुमंत गायकवाड यांना राजकिय दबावामुळे कर्ज नाकारले होते.२०१२-१३ ला इतर कारखान्यांना देण्याचा सभा आयोजित करून निर्णय घेतला.३३.३३ कोटीच्या देण्याची २६ मे २०१४ साली डॉ.विखे कारखान्याकडे चालविण्यास सुपूर्त केला.२०१८ ला मुदत संपला.पण २२जून २०२२ला करार संपुष्टात आला होता.८७ कोटीचे देणे होते.करार मागील वर्षात संपुष्टात आला व नवीन करार करणे गरजेचे होते ते झाले नाही म्हणून पुढील करार झाला नाही.२०१९-२० ला बंद राहिल्याने करार खंडित झाला त्यासाठी वार्षिक सभेत मंजुरी आवश्यक असताना तो केला नाही,त्यासाठी साखर आयुक्तांची परवानगी आवश्यक होते.१७ कोटीला सभासदांची परवानगी आवश्यक होते.मात्र ती टाळली गेली.निवडणु काळात असे करार करता येत नाही ते बेकायदा आहे.ही राजकीय खेळी आहे.शेतकरी संघटना, माजी मंत्री थोरात,माजी आ.कोल्हे गटाचा विजय होणार आहे.आम्ही प्रतिकूल काळात कामगार,सभासद यांना रित्या हाती पाठवले नाही आज त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य लोपले आहे.


डॉ.एकनाथ गोंदकर यावेळी बोलताना म्हणाले की,”सभासदांनी व कामगारांनी प्रतिकूल काळात ऊस दर कमी घेऊन कारखाना जागविला आहे.संजीवनी आणि कोळपेवाडी कारखान्यांचे कार्यालये हे तंट्यात होते.व आमचे कार्यालय दगडी इमारतीत होता इतके मोठे वैभव होते.मात्र यांनी याची वाट लावली आहे.राहुरी कारखान्यांची यांनी वाट लावली आता तिसऱ्या काखान्यांची त्यांना वाट लावली आहे हे थांबवायची आहे.तिसरा करार आपल्याला थांबवयाचा आहे.त्यांच्या कराराचा आम्ही खूप अभ्यास केला आहे.त्यामुळे हा करार बेकायदा आहे.त्यामुळे याविरुद्ध बंड करावे लागेल.गळीताचा तोटा १७ कोटी असताना १८.५० कोटी दाखवला आहे.१.५० कोटींचा घोळ आहे.साखर आयुक्तांना यांनी फसवले आहे.प्रवराचे जुने बॉयलर बसवले आणि सुधारणा केल्याचा आव आणला आहे.तो हाणून पाडायला हवा.सहकार मंत्र्यांना निवेदन दिले आहे.हा करार रद्द करायला हवा प्रसंगी हाती टिकुरे घ्यायला हवे असे आवाहन केले आहे त्यासाठी माजी मंत्री थोरात यांचे सहकार्य करू असे आश्वासन दिले आहे.प्रामाणिक पणा असेल तर कारखाना तोट्यात जाणार नाही.ऊस वाटून घेणाऱ्यांना शह दयायला हवा असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.


शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे बोलताना ते म्हणाले की,”हा देश राज्य कारखाना कायद्याने चालते.भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध शेतकरी संघटना लढा देते.श्रीरामपूर बाजार समिती निवडणुकीत ऍऊनखडी.काळे यांची गाडी फोडली तरी माघार घेतली नाही.इथे ते होऊ देणार नाही.राहुरी कारखाना २०० कोटीवरून ४०० कोटीवर नेला यांचे काय कर्तृत्व आहे.मुळाप्रवरा सहकारी वीज संस्थेतील गैरव्यवहार उघड केला तेथे प्रशासक आणला आहे.ही घरांनी आपण चुकीने निर्माण केली आहे ही उखडून टाकावी लागेल.शेतकरी संघटना शेवटपर्यंत शेतकऱ्यांबरोबर राहील असे आश्वासन दिले संघटना शेतकऱ्याबरोबरच राहणार आहे.शेतकऱ्यांचे वीज मंडळाचे ५०० कोटी रुपये वाचवले आहे.लोकांना गृहीत धरू नका,शेतकरी नेत्यांवर विश्वास ठेवा असे आवाहन केले आहे.

सभेचे प्रास्तविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल शेळके यांनी केले आहे.तर उपस्थितांना मार्गदर्शन माजी संचालक लताताई डांगे,शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक रुपेंद्र काले,आदींनी मार्गदर्शन केले आहे.

दरम्यान आज गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या सभेस कार्यक्षेत्रातील शेतकरी व सभासद मोठ्या संख्येने उपथीत असल्यांने सत्ताधारी विखे गटाविरुद्ध मोठी नाराजी दिसून आली असून त्याचा फटका आगामी निवडणुकीत बसणार असे चित्र दिसून आले आहे.

सूत्रसंचालन विठ्ठल शेळके यांनी तर आभार शेतकरी संघटनेचे संघटक शिवाजी जवरे यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close