खेळजगत
कोपरगावातील खेळाडूस शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील के.जे.सोमैया महाविद्यालयातील खेळाडू अक्षय मधुकर आव्हाड यास सन-२०२१-२२ साठी बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा क्रीडा क्षेत्रातील सवोच्च पुरस्कार ‘शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी’ निवड करण्यात आलेली आहे.त्याबाबत त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
दरम्यान अक्षय आव्हाड यास याआधी विद्यापीठस्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे.यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.सन-२०१९ या वर्षी श्रीलंका येथे झालेल्या बेसबॉल स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने कास्यंपदक पटकावले होते व आव्हाड यास बेस्ट पीचर म्हणून पारितोषिक देण्यात आले होते.
कोपरगाव येथील सोमैय्या महाविद्यालयाचा विद्यार्थी अक्षय आव्हाड यांच्या या निवडीने महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.त्याने या अगोदर विद्यापीठस्तरीय,राज्यस्तरीय,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसबॉल खेळामध्ये विशेष कामगिरी केलेली आहे.यासाठी त्याला अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते.सन-२०१९ या वर्षी श्रीलंका येथे झालेल्या बेसबॉल स्पर्धेत त्याने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.या स्पर्धेमध्ये भारतीय संघाने कास्यंपदक पटकावले होते व आव्हाड यास बेस्ट पीचर म्हणून पारितोषिक देण्यात आले होते.हा पुरस्कार प्राप्त होणारा तो कोपरगाव तालुक्यातील प्रथम खेळाडू ठरला आहे.
ग्रामीण भागात सर्वात प्रथम के.जे.सोमैया महाविद्यालयाने हा खेळ महाविद्यालयीन खेळाडूंनकरीता सुरू केला होता.महाविद्यालयाचे अनेक खेळाडू बेसबॉल खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे त्यांना सरकारी नोकरीमध्ये आरक्षण मिळवून ते विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत.संस्थेने वेळोवेळी महाविद्यालयातील खेळाडूंसाठी अनेक महागडे खेळाचे साहित्य उपलब्ध करुन दिलेले आहे.नुकतेच महाविद्यालयाने थ्रोविंग मशीन बेसबॉलच्या खेळाडूंसाठी खरेदी केलेले आहे.दरम्यान महाविद्यालय नेहमीच खेळाडूंना प्रोत्साहन देत असल्याची माहिती कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त संदीप रोहमारे यांनी येथे दिली आहे.आव्हाड याला महाविद्यालयाचे क्रीडा प्रमुख डॉ.सुनील कुटे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
अक्षय आव्हाड याने मिळविलेल्या यशाबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे,सचिव अॅड.एस.डी.कुलकर्णी,विश्वस्त संदीप रोहमारे,कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी सर्व पदाधिकारी,प्राचार्य डॉ. बी. एस.यादव,कार्यालय अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे आदींनी त्याचे अभिनंदन केले आहे.