गुन्हे विषयक
कर्ज न भरल्याने कामगारांची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगावात तालुक्यातील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखान्याचा कामगाराच्या नावावर गोड बोलून काढलेले २.४० लाखांचे कर्ज न भरल्याने त्याने चिठ्ठी लिहून त्यात आरोपीचे नाव लिहून आपली जीवन यात्रा संपवली असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मयत किशोर बनकर या कामगाराच्या नावावर ज्या बाळासाहेब या संशियत आरोपीने कर्ज घेतले होते त्याचे व त्याच्या कल्पना नामक पत्नीचे नाव घातले असून त्याच्या पत्नीने व त्याने आपल्या घरी दि.६ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या कामावर येऊन आपल्याला केवळ एक महिना पैशाची अडचण असल्याचे सांगून गोडगोड बोलून माझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन हे कर्ज दि.०७ सप्टेंबर २०२१ रोजी कोळपेवाडी परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याच्या नावावर असलेल्या पतसंस्थेतुन घेतले होते.मात्र महिना झाल्यावर मात्र त्याने ते कर्ज भरले नाही.त्यातून हि दुर्घटना घडली आहे.
मयत कामगार फकिरराव बनकर यांचे छायाचित्र.
वर्तमानात सहकारी बँकांचे फास कर्जदारांना चांगलेच अडचणीत आणत असल्याच्या घटना उघड होत आहेत.त्यात काही सहकारी संस्था शंभर टक्के कर्ज वसुली साठी कामगार जामीन असल्या शिवाय कर्जदारांना कर्ज देत नाही.त्यामुळे नजीकचे कार्यकर्ते आणि आणि ग्रामस्थ कामगारांना जामीन राहण्यासाठी सक्ती करताना दिसत आहे.त्यातून मानसिक ताण तणाव निर्माण होऊन त्यात अनेक जण आपली जीवन यात्रा संपवत असल्याचा घटना उघड होत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या कामगार कॉलनीत कामगार पतसंस्थेच्या जवळ असलेल्या एका घरात शुक्रवार दि.२८ एप्रिल रोजी रात्री १०.१५ वाजेच्या सुमारास घडली आहे.त्यात कारखाना कामगार फकिरराव उर्फ किशोर नारायण बनकर याचा मृत्यू झाला असल्याचे समजत आहे.त्यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहून आरोपीचे नाव लिहून आपल्या घराच्या पडवीत असलेल्या पंख्याला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन हि आत्महत्या केली असल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली आहे.
सदर घटना घरच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी एकच आरडाओरडा केला असता सदरची धक्कादायक बाब नजीकच्या ग्रामस्थांच्या लक्षात आली आहे.त्यांनी तातडीने त्यांना आधी कोपरगाव बस स्थानकासमोर असलेल्या खाजगी रुग्णलयात भरती केले होते.मात्र तेथील वैद्यकीय अधिकऱ्यानी त्यास कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला होता.त्यानंतर त्यांनी त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता तेथे उपचार करणाऱ्या अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे.
दरम्यान यात मयत किशोर बनकर या कामगाराच्या नावावर ज्या बाळासाहेब या संशियत आरोपीने कर्ज घेतले होते त्याचे व त्याच्या कल्पना नामक पत्नीचे नाव घातले असून त्याच्या पत्नीने व त्याने आपल्या घरी दि.६ सप्टेंबर २०२१ रोजी आपल्या कामावर येऊन आपल्याला केवळ एक महिना पैशाची अडचण असल्याचे सांगून गोडगोड बोलून माझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेऊन हे कर्ज दि.०७ सप्टेंबर २०२१ रोजी कोळपेवाडी परिसरात असलेल्या राष्ट्रवादीच्या जेष्ठ नेत्याच्या नावावर असलेल्या पतसंस्थेतुन घेतले होते.मात्र महिना झाल्यावर मात्र त्याने ते कर्ज भरले नाही.तीन वर्षात केवळ २५ हजारांची रक्कम भरली होती.वांरवार पाठपुरावा केल्यावर त्याने सदर कर्ज आपण २०२४ मध्ये गळीत हंगामास ऊस पीक कारखान्यास गेल्यावर भरतो असा वायदा करून आश्वासन दिले होते.मात्र कारखाना गळीत संपुनही त्याने ते भरले नाही.त्यामुळे,’सदर रक्कम आता २.७५ लाख झाल्याने आपल्याला झोप येत नाही” असा उल्लेख आहे.मयताने या कर्जाची घरच्यांना याची माहिती दिली नव्हती असे या चिठ्ठीवरून निदर्शनास येत आहे.याबाबत आपण बाळासाहेब याच्या पत्नीस सदर रक्कम न भरल्यास आपण फाशी घेऊ असे सांगितले होते.मात्र कल्पना वहिनीने मात्र ,”तुम्ही फाशी घेऊ नका आगामी मे-जून महिन्यात पैसे भरतो” अशी विनंती केली होती.
दरम्यान या कर्जबाबत कर्ज दिलेल्या व्यक्तीने मयतास तुझे कर्ज भरले असल्याची बतावणी केली होती.त्याने याबाबत सदर पतसंस्थेच्या कुदळे नामक कर्मचाऱ्याकडे चौकशी केली असता त्याने,”तुझ्या नावावर कर्ज भरले नाही तुझे तू पाहून घे” अशी कल्पना दिली होती असा त्या चिट्टीत उल्लेख दिसत आहे.वारंवार वायदे करूनही सदर कर्जाची रक्कम भरली नाही त्यामुळे आपण कर्जदाराच्या नावाचा उल्लेख करून आत्महत्या करत असल्याचे त्याने आपल्या चिट्टीत लिहून ठेवले आहे.व ग्रामीण पोलीस ठाण्यात मला फसविणाऱ्या बाळासाहेब याची हि चिट्ठी दाखवून तक्रार करावी असे म्हटले आहे.त्यामुळे आता तालुका पोलीस अधिकारी आता कोणती भूमिका घेणार या कडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.दरम्यान यातील फसवणूक करणारा इसम हा ग्रामपंचायतीच्या माजी पदाधिकाऱ्यांचा भाऊ असल्याची माहिती आहे.मात्र या प्रकरणात राजकीय दबाव असल्याची अद्याप तरी माहिती नाही.
सदर मयताच्या पश्चात पत्नी,दोन मुले असा परिवार आहे.मयताचा एक मुलगा ठेकेदारी पद्धतीत काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तर दुसऱ्याने नुकतीच उच्च माध्यमिक शालांत परीक्षा दिली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.मयताचे वडील हे या साखर कारखान्यात ५०-६० वर्षांपूर्वी नोकरीस आले होते.त्यानंतर मयताने याच कारखान्यात नोकरी पत्करली होती.ते मूळचे देवगाव रंगारी येथील रहिवासी असल्याचे समजत आहे.
सदर घटनेबाबत कोपरगाव तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद २७ /२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे केली आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड यांचे नेतृत्वाखाली पो.हे.कॉ.श्री.कोकाटे हे करत आहेत.