अपघात
अवकाळी पावसाचा बळी,कृषी क्षेत्राचे नुकसान,कोपरगाव तालुक्यातील घटना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात काल सायंकाळी पडलेल्या अवकाळी पावसामुळे रवंदे ग्रामपंचायत हद्दीत पत्र्याचे छत असलेल्या घरावर बाभळीचे झाड पडून त्यात दत्तात्रय मोरे (वय-३४)यांचे दुर्दैवी निधन झाले असल्याची घटना घडली आहे त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात एक लहान मुलगी,आई,वडील,पत्नी,असा परिवार आहे.

दरम्यान मंजूर येथील शेतकरी विजय उत्तम धुमाळ यांच्या शेतातील काढलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.या बाबत त्यांनी तेथील कामगार तलाठी यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असंता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना केला आहे.अवकाळी पावसाचा नुकसानीच्या बाबत महसुली अधिकाऱ्यांनी संवेदनशील असले पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने थैमान घातले आहे.पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या चार दिवसांत वादळी वाऱ्यासह गारपीट,वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे ०३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याची चर्चा आहे.
दरम्यान उत्तर नगर जिल्ह्यात काल सायंकाळी ०५ नंतर या पावसाने हजेरी लावून रात्री ०८ वाजे पर्यंत मंजूर,धामोरी,रवंदे आदी परिसरात मोठा धुमाकूळ घातला असल्याच्या बातम्या आहेत.
त्यात काल रात्री ०८ वाजेच्या सुमारास रवंदे ग्रामपंचायत हद्दीत एका घरावर झाड पडून त्याचे शेतमजूर असलेल्या आदिवासी विवाहित तरुणांचा अंत झाला आहे.त्याचे नाव दत्तात्रय मोरे असे आहे.
घटनेनंतर भाजपचे माजी तालुका अध्यक्ष सुभाष दवंगे यांचेसह ग्रामस्थांनी धाव घेऊन सदर तरुणास बाहेर काढले व उपचारार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवले होते तेथील उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.व या दुर्दैवी घटनेबाबद तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना अवगत केले होते.सदर ठिकाणी तहसीलदार विजय बोरुडे व अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिल्याची माहिती आहे.

दरम्यान मंजूर येथील शेतकरी विजय धुमाळ यांच्या शेतातील काढलेल्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे.या भागात काढणीला आलेल्या द्राक्ष बागांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.या बाबत त्यांनी तेथील कामगार तलाठी यांना दूरध्वनीवर संपर्क साधला असंता त्यांनी प्रतिसाद दिला नाही असा आरोप धुमाळ यांनी आमच्या प्रतिनिधींसोबत बोलताना केला आहे.अवकाळी पावसाचा नुकसानीच्या बाबत महसुली अधिकाऱ्यांनी संवेदनशील असले पाहिजे अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.