सामान्य प्रशासन
शासकीय योजनाची जत्रा कार्यक्रम घरोघर पोहचवा-आवाहन

न्यूजसेवा
शिर्डी-(प्रतिनिधी)
शिवसेना शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या वतीने,’शासकीय योजनांची जत्रा’ या योजनेची सुरवात उत्तर महाराष्ट्रात शिर्डी येथुन करण्यात आली सदर योजनांची जत्रा घरोघरी पोहचवा असे आवाहन बाळासाहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख यशवंत जाधव यांनी नुकतेच शिर्डी येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसांचे सरकार असून प्रत्येक गावागावात,घरोघरी सर्व शासकीय योजना पोहचवून संघटनात्मक बांधणी करू असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.
राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने सत्तेत आल्यावर सामान्य शेतकरी,नागरिक आदिसांठी विविध योजना आणल्या असून त्या जनतेत पोहचण्यासाठी त्यांनी,’शासकीय योजनांची जत्रा’ या योजनेची सुरवात उत्तर महाराष्ट्रात साईबाबांच्या शिर्डी येथुन,’हॉटेल शांतीकमल’ येथूनकरण्यात आली आहे त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी शिवसेना सचिव व उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी व शिवसेना उपनेते यशवंत जाधव,शिर्डीचे खा.सदाशिव लोखंडे,अ.नगर जिल्हा संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार व बाजीराव दराडे,महिला आघाडी जिल्हा प्रमुख विमल पुंडे व कावेरी नवले,शिवसेना राहाता तालुका महिला आघाडीच्या वनिता जाधव,संघटक अनिता धनक,युवासेना जिल्हाप्रमुख शुभम वाघ व महेश देशमुख तसेच सर्व उपजिल्हाप्रमुख,तालुका प्रमुख,उपतालुका प्रमुख,शहर प्रमुख,महिला आघाडी,सर्व पदाधिकारी व युवासेना पदाधिकारी तसेच शिवसैनिक बहुसंख्येने उपस्थित होते.
या मेळाव्यात शिवसेनेच्या वतीने प्रत्येक गावात शिवदूत योजना राबवण्यात येणार असून घरोघरी शासकीय योजनांची माहिती पोहचवण्यात येणार आहे.याप्रसंगी गजानन पाटील आणि अनिल घुगे यांनी सदर शासकीय योजनांची माहिती दिली आहे.
त्यानंतर विजय काळे,विठ्ठल घोरपडे यांनी संघटनात्मक बांधणी या विषयावर विचार मांडले असल्याची माहिती हाती आली आहे.शिर्डीचे खा.लोखंडे यांनी विकासकामांची माहिती दिली आहे.यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,”राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य माणसांचे सरकार असून प्रत्येक गावागावात,घरोघरी सर्व शासकीय योजना पोहचवून संघटनात्मक बांधणी करू असे आश्वासन उपस्थितांना दिले आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक बाळासाहेब सेनेचे जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी केले आहे तर सूत्रसंचालन बाजीराव दराडे यांनी केले आहे तर उपस्थितांचे आभार राजेंद्र देवकर यांनी मानले आहे.