जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील दोन गावांच्या दफनभूमीचा प्रश्न मार्गी-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

मागील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या धारणगाव व कुंभारीच्या मुस्लीम बांधवांची प्रमुख मागणी असलेला दफन भूमीचा प्रश्न आ.आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून शासनदरबारी केलेल्या पाठपुराव्यातून हा प्रश्न मार्गी लावला असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी कार्यालयाने दिली आहे.

मुस्लिम ग्रामस्थांचा मागील अनेक वर्षापासुनचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आ.काळे यांनी अल्पकाळात सोडवून मुस्लीम बांधवांची मोठी अडचण व होणारी गैरसोय दूर केली आहे.त्यामुळे धारणगाव,कुंभारी येथील राजू शेख व अन्य मुस्लीम बांधवानीं समाधान व्यक्त केले आहे.

मागील साडे तीन वर्षाच्या कार्यकाळात कोपरगाव तालुक्यातील धारणगाव आणि कुंभारी येथील मुस्लिम समाजातील नगरिकांचा दफन भूमीच प्रश्न ऐरणीवर आला होता त्यांनी याबाबत आ.काळे यांचे कडे तें निवडणूक आल्यावर पाठपुरावा सुरु केला होता.तो नुकताच मार्गी लागला आहे.त्याबाबतचे दफनभूमी मंजुरी आदेशांचे पत्र आ. काळे यांनी नुकतेच धारणगाव,कुंभारीच्या मुस्लीम ग्रामस्थांना सुपूर्त केले आहे.

सदर प्रसंगी तहसीलदार विजय बोरुडे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवाजी घुले, जिनिंग व प्रेसिंग सोसायटीचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,संचालक नानासाहेब चौधरी,गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे,माजी नगरसेवक मंदार पहाडे,फकीर कुरेशी,राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष नवाज कुरेशी,शैलेश साबळे तसेच धारणगाव येथील मारुतीराव चौधरी, नानासाहेब दवंगे, साहेबलाल शेख, छबुराव थोरात, राजेंद्र जाधव, प्रसाद गिरमे,दत्तात्रय जोंधळे,अब्दुल पटेल,करीम पटेल,सद्दाम पटेल,हमीद शेख,नाजीम पटेल,अस्लम शेख,अमन पटेल, लियाकत पठाण,सलीम पटेल,शौकत पठाण,कलीम पटेल,अमीर पठाण,अकीलशेख,सलीम पठाण,लतीफ शेख, इस्माईल शेख,हसन शेख,राजु शेख आदींसह मुस्लीम ग्रामस्थ बहु संख्येने उपस्थित होते.

दरम्यान मुस्लिम ग्रामस्थांचा मागील अनेक वर्षापासुनचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आ.काळे यांनी अल्पकाळात सोडवून मुस्लीम बांधवांची मोठी अडचण व होणारी गैरसोय दूर केली आहे.त्यामुळे धारणगाव,कुंभारी येथील राजू शेख व अन्य मुस्लीम बांधवानीं समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close