जयंती,पुण्यतिथी अभिवादन
…या गावात डॉ.आंबेडकर जयंती उत्सव संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोपरगाव तालुक्यातील लौकी ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशातील महू येथे बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा १४ एप्रिल १८९१ रोजी जन्म झाला.यंदा जयंती निमीत्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रम संपन्न झाले असून,देशाचे घटनाकार म्हणून भीमराव आंबेडकर अर्थात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाहिलं जातं.लौकी या ठिकाणी या उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी राहुल खंडीझोड यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करुन भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.
सदर प्रसंगी नगरसेवक दिनेश कांबळे,बुधिस्ट यंग फोर्सचे अध्यक्ष विजय त्रिभुवन,नगरसेवक संदीप भाऊ पगारे,सतीष खरात,संविधान चौकचे अध्यक्ष नितीन शिंदे,दिनेश निकम,संजय दुशिंग,संजय कांबळे,मनोज शिंदे,राजेंद्र उशिरे,रवी धुळे,रवी भालेराव आदी मान्यवरासंह परिसरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भिमराज खंडीझोड,योगेश खंडीझोड,शिवाजी खंडीझोड,रामदास खंडीझोड,माधव खंडीझोड,मनोज खंडीझोड,विकास खंडीझोड,पोपट खंडीझोड,संदीप खंडीझोड,श्रीकांत खंडीझोड,संजय खंडीझोड,सचिन खंडीझोड,सिद्धार्थ खंडीझोड यांनी मान्यवरांचे आभार मानले.