सण-उत्सव
नूतन वर्षानिमित्त…यांचे कडून कोपरगावात मोठी शोभायात्रा संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात नवीन वर्षानिमित्त गुडी पाडव्यानिमित्त श्री क्षेत्र नानीज धामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या शिष्य गणांनी नुकताच शहरात मोठी शोभायात्रा खडली असून त्याचे नागरिकांनी स्वागत केले आहे.
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून तो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात साजरा केला जातो.शालिवाहन संवत्सराचा हा पहिला दिवस आहे.वेदांग ज्योतिष या ग्रंथात सांगितलेल्या साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे.
अलीकडील काळात नवीन वर्ष हे इंग्रजी साजरे करण्याचा चुकीचा प्रघात पडला आहे.ते नूतन वर्ष आपले नाही हे सांगण्याचा स्तुत्य प्रयत्न स्वामी नरेंद्र महाराज यांच्या कडून सुरु आहे.कोपरगावात त्यांच्या शिष्याकडून शहरात मोठ्या उत्साहात संपन्न केला आहे.
सालाबाद प्रमाणे दरवर्षी श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या भक्तांकडून जिल्ह्यात गुढीपाडव्याला नवीन वर्षानिमित्त भव्य शोभा यात्रा काढण्यात येते.यावर्षी हि शोभायात्रा कोपरगाव येथे काढण्यात आली व साईबाबा तपोभूमी येथे आयोजित कार्यक्रमप्रसंगी प्रमुख यजमान म्हणून डॉ.मेघना देशमुख,पुष्पाताई काळे,व्यंकटेश बाप्पा,सोमेश्वर घोगरे,जगन बोठे,सयाजी भडांगे,गोकुळ वैष्णव,राजेंद्र घोटकुळे,सुरेश चंदनशिव,पगारे,स्वप्निल गायकवाड,राजेंद्र चेचरे,संदीप दीक्षित,अलका खर्डे,सोनाली जाधव,नगरसेविका माधवी वाघचौरे,अशोक मुसमाडे आदींसह भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.मेघना देशमुख यांनी देखील श्री क्षेत्र नानीजधामचे जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांच्या धार्मिक कार्याचा उल्लेख करून त्यांनी देशभरातील असंख्य भक्तांना खऱ्या समाधानाचा व आत्मज्ञानाचा मार्ग दाखविला आहे.गुढीपाडव्याला नवीन वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या भव्य शोभा यात्रेत सहभागी होवून जगदगुरु नरेंद्राचार्य महाराजांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.