कोपरगाव तालुका
पत्रकार सि.बी.गंगवाल अनंतात विलीन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील जुन्या पिढीतील जेष्ठ पत्रकार व गावकरी आणि लोकमत वृत्तपत्रात सुमारे पन्नास वर्षाहून अधिक काळ पत्रकारितेत आपले भविष्य घडविणारे चंद्रकुमार भाऊलालजी उर्फ सि.बी.गंगवाल (वय-७९) यांचे काल दुपारी ०१ वाजेच्या सुमारास निधन झाले होते त्यांच्यावर आज सकाळी १०.३० वाजता कोपरगाव येथील गोदतीरी असलेल्या पालिकेच्या स्मशान भूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे.
त्यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होते.त्यांचे सुपुत्र जितेंद्र गंगवाल यांनी मुखाग्नी दिला आहे.
सदर प्रसंगी संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष बिपीन कोल्हे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे,राजेंद्र सोनवणे,अंबादास बनकर,जिल्हा परिषद सदस्य महेंद्र काले,सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब डमाळे,पत्रकार सचिन धर्मापुरीकर,काशी विश्वनाथ ट्रस्टचे विश्वस्त संदीप चव्हाण आदींसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
सदर प्रसंगी बिपीन कोल्हे यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा देताना अनेक आठवणी जाग्या केल्या त्या सांगताना त्यांनी,”आजचे पत्रकार आर्थिक प्राप्तीसाठी पत्रकारिता करत आहेत” त्या वेळी सि.बी.गंगवाल यांनी अशी पत्रकारिता केली नाही.सडेतोड पत्रकारिता केली असल्याची आठवण करून दिली आहे.
सदर प्रसंगी त्यांच्या जीवनातील अनेक आठवणी उपस्थितांनी जागृत केल्या असून त्यात जैन समाज संघटनेचे अध्यक्ष स्रेयस गंगवाल,पैठणचे संजयकुमार पापडीवाल,ऍड.कासलीवाल,नगर आवृत्ती लोकमत संपादक सुधीर लंके,अनिल चुडीवाल,
साहेबराव दवंगे,जैन संघाचे संघपती प्रेमराज भंडारी,बाबासाहेब डमाळे,संतोष गंगवाल,महिंद्र काले,वैजापुरचे जैन समाजाचे कार्यकर्ते ,कोपरगाव पीपल्स बँकेचे अध्यक्ष कैलास ठोळे,औरंगाबाद येथील कार्यकर्ते प्रवीण लोहाडे,
कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनील देवकर आदींनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.