गुन्हे विषयक
कोपरगावात दोन गटात तुंबळ हाणामारी,पाच जखमी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील दोन गटात दोन परवा रात्रीच्या सुमारास तुंबळ हाणामारी झाली असून यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहे.कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही गटाच्या विरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे.या हाणामारीत आकाश गंगूले,बजरंग गंगूले,सागर मंजुळे,अक्षय मंजुळे,कृष्णा कापसे,आदी पाच जण जखमी झाले आहे.मात्र पोलिसांनी कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.नूतन पोलीस अधिकाऱ्यांना हे आव्हान मानले जात असून ते या असामाजिक तत्वांना कसे हाताळतात हे लकवरच आगामी शांततेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या प्रकरणी विरुद्ध बाजूचे आरोपी व दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी अक्षय रामदास मंजुळे (वय-२३) रा.महादेव नगर याने आरोपी बाला गंगूले,संजय गंगूले,कैलास गंगूले,आकाश गंगूले,सर्व रा.कोपरगाव यांचे विरुद्ध आपण महादेवनगर येथील घरी जेवण करत असताना रात्री ११.३० वाजता आरोपी हे त्या ठिकाणी आले व त्यांनी दत्तनगर येथील सायंकाळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून जोरजोरात शिवीगाळ करून आरोपीनी सिमेंटचा गट्टू हातात घेऊन साक्षिदार सागर याचे डोक्यात मारला आहे.सदर भांडण सोडविण्यास आलेल्या साक्षिदार यांनाही लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने पाठीवर,हातावर,डोक्यावर मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
कोपरगाव शहरातील विशिष्ट उपनगरात वारंवार गुन्हे,हाणामारी हा नित्याचा प्रकार असून त्या विरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कडक भूमिका घेतली तरच शहरातील कायदा सुव्यवस्था सुरळीत रहाते अन्यथा त्यात वाढ होऊन शहरातील शांतता धोक्यात येते असे मागील पार्श्वभूमीवर वारंवार दिसून आले आहे.अशीच घटना नुकतीच घडली असून दि.०५ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास दत्त बेकरी समोर दोन्ही गट आमने-सामने आले होते.त्यात बेस बॉल काठी (स्टिक) कोयत्याचा वापर करण्यात आला आहे.यातील पहिल्या गुंह्यातील आरोपी कृष्णा कापसे,सागर उर्फ मोद्या मंजुळे,महेश शेलार,बंटी गणेश जाधव आदी चार जणांनी फिर्यादी यास गोदाम गल्ली येथील दत्त बेकरी समोर हातातील कोयत्याचा धाक दाखवून,”तुम्ही आमच्या नादी लागले तुम्हाला एकेकाला कोयत्याने तोडून टाकीन असा दम दिला आहे.तर मोद्या मंजुळे याने त्याच्या हातातील बेस बॉलच्या काठीने फिर्यादी आकाश संजय गंगूले याच्या पाठीवर व पोटरीवर जोरजोराने फटके मारून गंभीर जखमी केले आहे.तर आरोपी महेश शेलार व बंटी जाधव यांनी साक्षिदार यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आहे.
या प्रकरणी फिर्यादी याने दाखल केलेल्या फिर्यादी आकाश संजय गंगूले (वय-२२) याच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१०७/२०२३ भा.द.वि.कलम-३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणी विरुद्ध बाजूचे आरोपी व दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी अक्षय रामदास मंजुळे (वय-२३) रा.महादेव नगर याने आरोपी बाला गंगूले,संजय गंगूले,कैलास गंगूले,आकाश गंगूले,सर्व रा.कोपरगाव यांचे विरुद्ध आपण महादेवनगर येथील घरी जेवण करत असताना रात्री ११.३० वाजता आरोपी हे त्या ठिकाणी आले व त्यांनी दत्तनगर येथील सायंकाळी झालेल्या भांडणाची कुरापत काढून जोरजोरात शिवीगाळ करून आरोपीनी सिमेंटचा गट्टू हातात घेऊन साक्षिदार सागर याचे डोक्यात मारला आहे.सदर भांडण सोडविण्यास आलेल्या साक्षिदार यांनाही लाकडी दांडक्याने व लोखंडी गजाने पाठीवर,हातावर,डोक्यावर मारून जीवे मारण्याची धमकी दिली आहे असे म्हणून गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.१०८/२०२३ भा.द.वि.कलम ३२६,३२४,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एस.सी.पवार हे करत आहेत.