शैक्षणिक
…या कनिष्ठ महाविद्यालयातील विदयार्थ्यांचा निरोप समारंभ

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथे इयत्ता बारावी विज्ञान व वाणिज्य या विभागात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उच्च माध्यमिक परीक्षा-२०२३ साठी निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी आपले उच्च माध्यमिक शिक्षणाची पायरी सोडून महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करत असतात त्यामुळे हा क्षण मोलाचा मानला जातो त्यासाठी या कक्षेतील विद्यार्थी जाताना शाळेत निरोप समारंभ साजरा केला जातो.असाच कार्यक्रम नुकताच चासनळी येथे संपन्न झाला आहे.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सुजित रोहमारे हे होते.
सदर प्रसंगी प्रा.ढेकळे सर प्रा.रणधीर सर प्रा.पवार,प्रा.कहार सर प्रा.वैराळ सर प्रा.आदमाने सर श्री.कोकाटे आर.पी.प्राध्यापिका.शेलार.जे.एस.प्राध्यापिका गुजर पी.एस.हे सर्व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य बारे एन.जी.यांनी केले आहे.या कार्यक्रमाच्या वेळी इयत्ता बारावी वर्गातील कु.प्रीती सानप,कु.पारखे गायत्री,कु.गाढे अंजली तसेच चांदगुडे रितेश शेळके विराज या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.रौंदाळे वैष्णवी या विद्यार्थिनींनीने केले तर या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक रणधीर यांनी मानले आहे.