कोपरगाव शहर वृत्त
कोपरगाव साठवण तलावाच्या कामास गती द्या-…या नेत्याच्या सूचना

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण असलेल्या ५ क्रमांकाच्या साठवण तलावाच्या माध्यमातून कायमस्वरूपी मार्गी लागणार असून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी सदर साठवण तलावाच्या कामाची गती वाढवावी अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी दिल्या आहेत.
“ब्रिजलाल नगरच्या पाण्याच्या टाकीचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे हे काम दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी या कामाची गती वाढविणे अत्यंत गरजेचे असून पावसाळ्याच्या आत बहुतांश काम पूर्ण होईल याची काळजी घ्या”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.
कोपरगाव शहराला ऐन पावसाळ्यातही आठवड्याभराने पिण्याचे पाणी मिळत असून हि राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांसाठी चिंतनीय बाब ठरली आहे.त्यामुळे शहराला नियमित पाणी मिळण्यासाठी पाच क्रमांकाच्या तलावाच्या कामासाठी गती मिळणे गरजेचे आहे.या पार्श्वभूमीवर आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच तहसीलदार विजय बोरुडे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी,लक्ष्मी कन्स्ट्रक्शनचे अधिकारी यांच्या समवेत तातडीची बैठक घेतली आहे.व वर्तमानात सुरु असलेल्या ५ क्रमांकाच्या साठवण तलावाच्या कामाचा आढावा घेतला आहे.
सदर प्रसंगी ते म्हणाले की,”कोपरगाव शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य कायमस्वरूपी दूर व्हावे यासाठी १३१.२४ कोटी निधीतून ५ नं. साठवण तलाव व वितरण व्यवस्थेचे काम सुरु आहे.आजपर्यंत साठवण तलावाचे खोदाईचे ७० टक्के काम पूर्ण झाले असून २२ किलोमीटरची पाईप लाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे.बेट भागाच्या पाण्याच्या टाकीचे ८० टाके काम पूर्ण झाले आहे.
ब्रिजलाल नगरच्या पाण्याच्या टाकीचे २५ टक्के काम पूर्ण झाले आहे हे काम दिलेल्या मुदतीच्या आत पूर्ण करून कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी या कामाची गती वाढविणे अत्यंत गरजेचे असून पावसाळ्याच्या आत बहुतांश काम पूर्ण होईल याची काळजी घ्या.तसेच ज्या ज्या ठिकाणी पाईप लाईन टाकणे आवश्यक आहे त्या सर्व ठिकाणी पाईप लाईन टाका नागरिकांच्या तक्रारी येवू देवू नका अशा सूचना केल्या आहेत.
तसेच या बैठकीत समृद्धीच्या अधिकाऱ्यांसमवेत देखील चर्चा करून समृद्धी महामार्गामुळे ज्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे त्यापैकी बहुतांश रस्त्यांची आजवर दुरुस्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी एम.एस.आर.डी.च्या अधिकाऱ्यांनी ठेकेदाराला सूचना देवून लवकरात लवकर रस्त्यांची कामे पूर्ण करावीत अशा सूचना आ.काळे यांनी शेवटी दिल्या आहेत.