महावितरण विभाग
वीजचोरी विरोधात मोहिम सुरु,कोपरगाव तालुक्यात खळबळ
न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात महाविरण कंपनीने अनधिकृत ग्राहकांना वेळोवेळी सांगुनही ग्राहक अधिकृत कनेक्शन घेत नाही.किंवा अधिकृत कनेक्शन असले तरी वीजचोरी काही थांबत नाही.त्यामुळे तालुक्यातील सवंत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी करंजी,नऊचारी,पढेगाव परिसरात वीजचोरी रोखण्यासाठी मोहिम राबवली या मोहिमेत एकुण २० ग्राहक सापडले असुन त्यात कृषी पंपाच्या जोडणीवर घरगुती वीजवापर करणे,अधिकृत कनेक्शन असुनही विज चोरुन वापरणे आदी ग्राहकांवर कारवाई सुरु केली आहे त्यामुळे अवैध वीज वापरणाऱ्या ग्राहकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
“वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असुन,जे शेती व घरगुती ग्राहक अनधिकृत पणे विजेचा वापर करतात अशा ग्राहकांनी आपले वीज जोडणी अधिकृत करून घ्यावी,तसेच कोणीही सिंगल फेज शेती पंप मोटर,हीटर,शेगडी,कुट्टी मशीन आदी उपकरणांचा वापर करू नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल”-जितेंद्र बोरसे,कनिष्ठ अभियंता,महावितरण कंपनी,संवत्सर.
महावितरणच्या प्रत्येक फीडरवर अनेक ग्राहक जोडलेले असतात.फिडरवरून दिली गेलेली वीज आणि संबंधित ग्राहकांच्या मीटरवर नोंद झालेला विजेचा वापर यांची पडताळणी करून वीजगळती निश्चित केली जाते.मुख्यतः वीज चोरीमुळे तूट वाढते.महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून प्रत्येक झोनमधील सर्वाधिक वीजगळती असलेले फीडर्स निश्चित केले.त्यानंतर त्यांच्याशी जोडलेल्या घरगुती आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज वापरावर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
संबंधित ग्राहकांच्या मीटरमध्ये अचूक रिडिंग येत आहे का ? मीटरमध्ये फेरफार केला आहे का ? कोठे आकडा टाकून वीजचोरी होत आहे का याची माहिती महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी काढली व कारवाई सुरु केली आहे.त्यामुळे वीज चोरी करणाऱ्या ग्राहकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परिणामी त्या त्या भागातील वीजचोरीला आळा बसला असून ५ दशलक्ष युनिटची वीजचोरी रोखली गेली असल्याचे उघड झाले आहे.महावितरणच्या घरगुती ग्राहकांपैकी बहुतांश ग्राहक हे शंभर युनिट वीज वापरणारे असून अशा पन्नास हजार ग्राहकांच्या एक महिन्याच्या वीज वापराएवढी ही वीज आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील महावितरण कंपनीचे अधिकारी सजग झाले असून त्यांनीही अशीच कारवाई सुरु केली आहे.त्यामुळे वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशा वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असुन,जे शेती व घरगुती ग्राहक अनधिकृत पणे विजेचा वापर करतात अशा ग्राहकांनी आपले वीज जोडणी अधिकृत करून घ्यावी,तसेच कोणीही सिंगल फेज शेती पंप मोटर,हीटर,शेगडी,कुट्टी मशीन आदी उपकरणांचा वापर करू नये अन्यथा येणाऱ्या काळात अशा अनधिकृत वीज वापरणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल प्रसंगी दंडात्मक किंवा फौजदारी कारवाई देखील करण्यात येणार असल्याचा इशारा महावितरण कंपनीचे संवत्सर कक्षाचे कनिष्ठ अभियंता जितेंद्र बोरसे यांनी शेवटी दिला आहे.