धार्मिक
परदेशातील पाहुण्यांनी घेतले शुक्राचार्य समाधीचे दर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव बेट येथे मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गयाना या देशाचे भारतातील राजदूत डॉ.के.जे.श्रीनिवास हे नुकतेचयेऊन गेले आहे.
कोपरगाव शहराच्या आग्न्येय दिशेस हाकेच्या अंतरावर देवगुरु ब्रहस्पती व दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले क्षेत्र कोपरगाव बेट हे पावन क्षेत्र आहे.त्याच ठिकाणी समुद्र मंथनातून मिळालेले रत्न वाटपावरून देव-दानव युद्ध झाले होते.या युद्धात दानवांना जिवंत करण्यात अहंम भूमिका निभणारी शुक्राचार्यांची ‘संजीवनी विद्या’ बहराला आली होती.या ठिकाणी ऐत्याहसिक ब्रहस्पती पुत्र कच व शुक्राचार्य कन्या देवयानी यांची प्रेम कथा फुलली होती.या ठिकाणीच संजीवनी विद्या शुक्राचार्यांकडून कचाने पळवली होती.त्या ठिकाणी अद्यापही संजीवनी विद्या दिलेला संजीवनी पार अस्तित्वात आहे.
याच ठीकाणी शुक्राचार्य मंदिर आहे.त्या ठिकाणी राज्यातून व परप्रांतातून अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात.वर्तमानात या मंदिराची प्रसिद्धी सातासमुद्रापार गेली असून त्याचे प्रत्यंतर नुकतेच गयानाचे राज्यपाल येऊन त्यांनी शुक्राचार्य मंदिरात येउन शुक्राचार्य समाधीचे दर्शन घेतले त्यावरून आले आहे.
मंदिरात गुरू शुक्राचार्य महाराजांचे मनोभावे दर्शन घेतले नंतर त्यांनी आवर्जुन मंदिराचा इतिहास तसेच मंदिराचे महत्त्व,मंदिरात साजरे केले जाणारे उत्सव या बद्दल जाणून घेतले.तसेच आम्हा सर्वांची आस्थेने चौकशी केली व आपण करत असलेल्या महाराज्यांच्या व मंदिर कार्याबद्दल आमचे खूप खूप कौतुक केले आहे. व जाताना त्यांनी आम्हा सर्वां बरोबर त्यांच्या मोबाईल मध्ये खास फोटोही काढले आहे. इतक्या मोठ्या व्यक्तिमत्त्वाने गुरू शुक्राचार्य मंदिराला भेट दिल्या बद्दल मंदिर प्रशासनाचे वतीने त्यांचा खास सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,तसेच मंदीर प्रमुख सचिन परदेशी,उपमंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे,नितीन भवर,संजय वडांगळे,बाळासाहेब गाडे,बाळासाहेब लकारे,भागचंद रुईकर व मंदिरातील गुरू, व्यवस्थापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.