शैक्षणिक
विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच गावचा विकासही करावा-गटविकास अधिकारी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांनी स्वतःबरोबरच गावचा विकासही करावा आणि तो विकास करण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन स्वतः प्रतिनिधित्व करून गाव आणि त्याचबरोबर स्वतःचा विकास करून घेणे हेच खरे यांनी सच्चे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांनी कोपरगाव तालुक्यातील डाऊच बु.येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
दोन्ही संकल्पित छायाचित्रे.
“प्रत्येक विद्यार्थ्याने जबाबदारीने काम करावे एन.एस.एस.मध्ये काम करत असताना पर्यावरणास विशेष प्राधान्य द्या या भूमातेचे पर्यावरण आपल्याला कसे आबाधित ठेवता येईल यासाठी आपण प्रयत्न करा आणि त्यासाठी गावचा विकास आपणास करावयाचा आहे.त्याचबरोबर वृक्षारोपण आणि अंधश्रद्धा निर्मूलन याला विशेष प्राधान्य द्या”-डॉ.बी.एस.यादव,प्राचार्य,के.जे.सोमैय्या महाविद्यालय,कोपरगाव.
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना,कोपरगाव येथील के.जे.सोमय्या महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच डाऊज बुद्रुक येथे विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सचिनजी सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले आहे त्या वेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे या प्रसंगी उपस्थित होते.
सदर प्रसंगी कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटीचे संचालक रोहिदास होन,महाविद्यालय विकास समिती सदस्य संदिप रोहमारे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,सरपंच दिनेश गायकवाड,उपसरपंच भिवराव दहे,बाजीराव होन,माजी सैनिक राजेंद्र गायकवाड,डाऊच ग्रामपंचायतीच्या सदस्या उषाताई ढमाले,कल्याण ढमाले,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतीलाल दहे,जिल्हा परिषद प्राथमिक शाळचे मुख्याध्यापक श्री शेख आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”आपण गावचा सर्वेक्षण करा गावामध्ये ज्या तुम्हाला सकारात्मक गोष्टी आढळतात त्या आमच्यापर्यंत कागदपत्रे पाठवा ज्या गोष्टी तुम्हाला नकारात्मक आढळतात ते आम्हाला सांगा आपण सर्व मिळून हे काम करण्यासाठी बांधील आहोत.शासनाच्या योजना समजून घ्या गावचे सर्वेक्षण करा आणि आपला या सात दिवसांमध्ये चांगले विकास करून घ्या त्याचबरोबर प्रत्येक विद्यार्थ्याने व्यासपीठावर बोलण्याची तयारी ठेवा आणि आपण निर्भीडपणे बोलू शकतो असा आत्मविश्वास आपल्यात निर्माण करा,प्रत्येक गावामध्ये काही ना काही मतभेद असतातच ते मतभेद विसरून प्रत्येकाने एकत्र येऊन सर्वांनी मिळून आपल्या गावचा विकास करून घ्या आणि आपले गाव जगाच्या पातळीवर पुढे कसे नेता आहेत याच्यासाठी सदैव प्रयत्न करा असे आवाहन शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.बी.एस.गायकवाड,सह कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.एस.एस. नागरे,प्रा.डॉ.एस.के.बनसोडे यांनी विशेष परिश्रम घेतले.