गुन्हे विषयक
अवैध मांज्याचा विक्री,कोपरगावात दोघांवर गुन्हा
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर आणि परिसरात अवैध पतंगाचा मांजा विक्री करण्यास प्रतिबंध असतानाही कोपरगाव शहरात आरोपी अरबाज फिरोज पठाण व दानिश शब्बीर अत्तार आदींनी माधवबागेच्या जवळ अवैध मांजा विक्री करून महाराष्ट्र शासनाच्या आदेशाचा भंग केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी पो.कॉ.महेश रघुनाथ फड (वय-३१) यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे अवैध मांजा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोपरगाव शहरात कोपरगाव बेटासह शहरात अनेक नागरिकांना मांजामुळे आपला जीव गमवावा लागला,तर अनेकजण जखमी झाले.यासह हजारो पक्षांनाही चिनी मांजामुळे आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून कोपरगाव शहर पोलिसांनी चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे.त्यामुळे अवैध मांजा विक्रि करणाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”पतंग उडविण्यासाठी चिनी मांजाच्या होणाऱ्या वापरामुळे पक्षांसह माणसांच्याही जीवाला धोका निर्माण होतो.आगामी ‘मकर संक्राती’चे औचित्य साधून शहरातील अनेक भागांत हौशी नागरिक, लहान मुले पतंग उडवतात.मात्र,काही नागरिक पतंग उडविण्यासाठी चिनी,नायलॉन मांजाचा वापर करीत असल्याच्या घटना गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.
कोपरगाव शहरात कोपरगाव बेटासह शहरात अनेक नागरिकांना मांजामुळे आपला जीव गमवावा लागला,तर अनेकजण जखमी झाले.यासह हजारो पक्षांनाही चिनी मांजामुळे आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.या पार्श्वभूमीवर गेल्या काही वर्षापासून कोपरगाव शहर पोलिसांनी चिनी मांजाची विक्री करणाऱ्यांवर ठोस कारवाई करण्याचा बडगा उगारला आहे.पोलिसांनी चिनी मांजावर बंदी घातलेली असतानाही शहरातील मध्यवर्ती भागांत मुख्य रस्त्यावर सर्रासपणे चिनी मांजाची विक्री होत असून,या विक्रेत्यांवर पालिका प्रशासन कारवाई करण्यात कुचराई करत असल्याचे निदर्शनास आले आहे.त्यामुळे नागरिक आणि पक्षी यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात पोलिसांनी हि कारवाई केली आहे.
त्यात शहरातील आरोपी अरबाज फिरोज शेख (वय-२३) दनिश शब्बीर आत्तार (वय-१९) दोघे रा.सुभाषनगर कोपरगाव या दोघांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,पो.हे.कॉ.डी.आर.तिकोणे यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या गुन्ह्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद क्रं.१०/२०२३ भा.वि.१८८,३३६ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ५ अन्वये नोंद केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहे.