जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

परिवाराबरोबरच समाजात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता महिलांत-डॉ.केदारी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

आपल्या परिवाराबरोबरच समाजात खंबीरपणे उभे राहण्याची क्षमता महिलांमध्ये असल्याचे प्रतिपादन ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ.विश्वास केदारी कोपरगाव येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“महिला तक्रार निवारण समितीचा उद्देश नमुद करतांनाच सशक्तीकरण झालेली महिला ही कधीच अशक्त नव्हती,कारण महिला संगोपन करण्याची जबाबदारी ती सक्षमपणे पार पाडत असते.यासाठी आवश्यक असणारे अनेक गुण हे महिलांना नैसर्गिकरित्या मिळालेले असतात”-डॉ.विश्वास केदारी,समुपदेशक,ए.आय.एफ.

शाळा,महाविद्यालयांमध्ये मुली व महिलांवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी राज्य शासनाने आता सर्व माध्यमांच्या व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये ‘महिला तक्रार निवारण कक्ष’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे शाळांमध्ये घडणाऱ्या अशा घटनांवर आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.गेल्या काही दिवसांत शाळांमध्ये होणाऱ्या महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.बंगळुरु आणि इतर राज्यांमध्ये शाळकरी मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांनी समाजाला सुन्न केले.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात आता शाळांमध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानुसार कोपरगाव येथील के.जे.सोमैय्या महाविद्यालयांत हि समिती स्थापन केली महिला तक्रार निवारण समिती व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच ‘तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण’ कार्यशाळेचे मोठ्या उत्साहात आयोजन करण्यात आले होते त्या वेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी प्रो.(डॉ.)एस.आर.पगारे,कार्यालयीन अधीक्षक डॉ.अभिजित नाईकवाडे,प्रा.नीता शिंदे,डॉ.एस.जी.कोंडा,डॉ.आर.ए. जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”महिला तक्रार निवारण समितीचा उद्देश नमुद करतांनाच सशक्तीकरण झालेली महिला ही कधीच अशक्त नव्हती,कारण महिला संगोपन करण्याची जबाबदारी ती सक्षमपणे पार पाडत असते.यासाठी आवश्यक असणारे अनेक गुण हे महिलांना नैसर्गिकरित्या मिळालेले असतात.आपल्याकडे असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन आज महिलांनी देश-विदेशात आपल्या कार्याचा ठसा उमटविल्याचे ही त्यांनी शेवटी नमुद केले आहे.

यावेळी ए.आय.एफ.च्या समुपदेशिका मिस.के.विपुलता यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने राबविलेल्या विविध उपाय योजनांचा उल्लेख केला.तसेच महिलांमध्ये निर्णयक्षमता विकसित करण्याबरोबरच स्त्री अस्मितेसाठी अशा कार्यशाळेची आवश्यकता असल्याचे नमुद केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बी.एस.यादव यांनी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य व कर्तव्य अधोरेखित करतांनाच कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळाच्या तक्रारीची दखल घेण्याचे काम सर्वप्रथम अंतर्गत तक्रार निवारण समिती करत असते असे नमुद केले आहे.महाविद्यालयातील विद्यार्थीनीच्या सुरक्षितेसाठी समितीच्या वतीने राबवित असलेल्या उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले आहे.

या कार्यशाळेचे प्रास्ताविक समितीच्या प्रमुख डॉ.सुरेखा भिंगारदिवे यांनी केले आहे.सदर कार्यशाळेचे उद्घाटन ए.आय.एफ.चे समुपदेशक डॉ.विश्वास केदारी यांनी केले आहे.तर पाहुण्याचा परिचय डॉ.एस.के.बनसोडे यांनी करुन दिला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रज्ञा कडु यांनी तर उपस्थितांचे आभार समितीच्या सदस्या प्रा.वर्षा आहेर यांनी मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close