आंदोलन
प्रदेशाध्यक्ष आ.पाटील निलंबन,कोपरगावात,’निषेध आंदोलन’

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे आज सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास कोपरगाव राष्ट्रवादीच्या वतीने,’निषेध आंदोलन’ करून कोपरगाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
“राज्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात राज्याच्या जनतेच्या अतिशय महत्वाच्या विषयाला वाचा फोडून सरकारला धारेवर धरले.सीमा प्रश्न,राष्ट्रपुरुषाचा अपमान करणाऱ्या प्रवृत्ती,अतिवृष्टी नुकसान भरपाई आदी विषयांना हात घातला.त्यावेळी सरकारला घेरले जाण्याच्या भीतीपोटी अभ्यासू व्यक्तींना बाजूला ठेवण्याच्या उद्देशातून विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी निलंबनाची कृती केली आहे”-संदीप वर्पे,कार्याध्यक्ष,जिल्हा राष्ट्रवादी काँर्गेस अ.नगर.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे.विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे.या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात बैठक झाली.त्यानंतर पाटील यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस सुरु असताना हे नाट्य घडले आहे.यावेळी अभिनेता सुशांतसिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी केली जाईल असं उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं होत. यावेळी विरोधकांना बोलू दिलं जात नाही,असं म्हणत विरोधीपक्षातील आमदार सभागृहाच्या वेलमध्ये उतरले.त्यावेळी जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्षांना सुनावलं.यावेळी जयंत पाटील यांच्याकडून अध्यक्षांना उद्देशून असंविधानिक शब्दाचा वापर केल्याचा आरोप आहे.त्यावरून आता राष्ट्रवादीने राज्यात रान पेटविण्याचा निर्णय घेतला आहे.त्याला अनुसरून आज सकाळी कोपरगाव तहसील कार्यालयासमोर कार्यकार्त्यानी जमून हे निवेदन दिले आहे.
यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,शहराध्यक्ष सुनील गंगूले,युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्रावण आसणे,शिवाजी घुले,सुनील मांजरे,मनोज जगझाप, दिनार कुदळे,विष्णु शिंदे,माजी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,सदस्य मधुकर टेके,माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,कृष्णा आढाव,दिनकर खरे,फकीर कुरेशी,अजीज शेख,राजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार,चंद्रशेखर म्हस्के,जावेद शेख,प्रकाश दुशिंग,सांडूभाई पठाण,देवेन रोहमारे,रामदास केकाण,संदीप कपिले,धनंजय कहार,वाल्मीक लहिरे,अशोक आव्हाटे,इम्तियाजअत्तार,राजेंद्र आभाळे,आकाश डागा आदीसह बहुसंख्य राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.