निवडणूक
कोपरगाव तालुक्यात…इतक्या वाजे पर्यंत निकाल अपेक्षित
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींची निवडणूक आज मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या असून आता प्रशासनास मतमोजणीचे वेध लागले आहेत.त्यांनी एकूण आज ५७ हजार ३१० हजार मतदारांपैकी २३,९०२ पुरुष तर २१ हजार ६२६ स्रिया असे एकूण ४५ हजार ५२८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून त्याची मतमोजणी उद्या सकाळी १० वाजता सुरु होणार आहे.त्याचा निकाल दुपारी एक ते तीन पर्यंत हाती येईल असा अंदाज व्यक्त होत आहे.यात मागे पुढे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कोपरगाव तालुक्यातील संपन्न झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी ११०-१२५ अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून नऊ टेबल व अकरा फेऱ्यांच्या माध्यमातून तहसीलदार विजय बोरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार असून त्यासाठी सर्व व्यवस्था व चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्री शिरसाठ यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
राज्यातील “ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या;तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जाहीर झाल्या होत्या अनेक ठिकाणी दुरंगी तर काही ठीकाणी तिरंगी लढती संपन्न झाल्या आहेत.वेस-सोयगाव,करंजी,खिर्डी गणेश आदी ठिकाणी मात्र तिरंगी लढती झाल्याचे दिसून आले आहे.आता कार्यकर्त्यांना आणि मतदारांना मतमोजणीचे वेध लागले आहे.उद्या मंगळवार दि.२० डिसेंबर रोजी हि मतमोजणी संपन्न होत आहे.
त्यासाठी नऊ टेबलची व्यवस्था करण्यात आलेली आहे.व त्यासाठी अकरा फेऱ्यास संपन्न होणार आहे.त्यासाठी उमेदवार आणि त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी यांनी एक तास अगोदर हजर रहावे असे आवाहन तहसीलदार विजय बोरूडे यांनी केले आहे.
दरम्यान पुढे गावाचे नाव प्रभाग संख्या व मतमोजणी संख्या दर्शवली आहे.यात पहिल्या फेरीत शिंगणापूर (सहा प्रभाग-४,४३०) ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रथम होणार आहे.त्याच बरोबर सडे,(तीन प्रभाग-१०४६) कोळपेवाडी,(पाच प्रभाग-३६८०) शहापूर,(तीन प्रभाग-९२७)
चांदेकसारे,(पाच प्रभाग-१७८२) मोर्विस,(तीन प्रभाग-१०४६) डाऊच बु.(तिन प्रभाग-८७४) बक्तरपूर,(तीन प्रभाग-७७८) सोनेवाडी,(पाच प्रभाग-३१३४) करंजी,(चार प्रभाग-२६६५) रांजणगाव देशमुख,(चार प्रभाग-२७७९) आदी गावांची मतमोजणी पहिल्या फेरीत संपन्न होत आहे.या गावांची वेळ साधारण सकाळी १० ते ११.२५ या वेळेत संपन्न होईल असा अंदाज आहे.
तर दुसऱ्या फेरीत भोजडे,(तीन प्रभाग-१८३१) माहेगाव देशमुख,(चार प्रभाग-२७३१) वडगाव,(तीन प्रभाग-९६८) डाऊच खु.(तीन प्रभाग-१३७१) देर्डे कोऱ्हाळे,(तीन प्रभाग-१४१२) बहादराबाद,(तीन प्रभाग-१६५०) आदींचा समावेश आहे.
हि फेरी ११.४५ ते १२.१५ वाजता संपन्न होईल,
तर तिसऱ्या फेरीत पढेगाव,(चार प्रभाग१९९२) तळेगाव मळे,(तीन प्रभाग-१०७२) चासनळी,(चार प्रभाग-१९६९) धारणगाव (चार प्रभाग-१९४७) आदी गावांचा समावेश असुन हि फेरी साधारण १.४५ ते २.१५ वाजता संपन्न होईल असा अंदाज आहे.
तर अखेर तिसऱ्या फेरीत वेस-सोयगाव,(तीन प्रभाग-१६१३) खिर्डी गणेश,(तिन प्रभाग-१७२४) बहादरपूर,(तीन प्रभाग-१६५०) हंडेवाडी,(तीन प्रभाग-५६१) खोपडी (तीन प्रभाग-९९३) आदी पाच गावांचा समावेश आहे.हि अखेरची फेरी साधारण ३.१५ ते ४.१५ पर्यंत संपन्न होईल असा अंदाज आहे.या वेळेत कमी अधिक होऊ शकते याची वाचकांनी नोंद घ्यावी असे आवाहन केले आहे.