खेळजगत
कोपरगाव येथील तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत…या महाविद्यालयाचे यश
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदगुरु गंगागिरीजी महाराज महाविद्यालय नुकत्याच पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १९ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात लक्षवेधी यश संपादन केले आहे.
दरम्यान सोमैय्या महाविद्यालयातील सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर. सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेतील विजयी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे-मुली-आरती जगताप-४००मी.धावणे द्वितीय,१५०० मी.धावणे प्रथम, सपकाळ तन्वी-थाळीफेक प्रथम,त्रिभुवन मयुरी-तिहेरी उडी प्रथम,चव्हाण वर्षा-गोळाफेक तृतीय,मुले-उदय सोनवणे-३००० मी.धावणे व ५००० मी धावणे द्वितीय,आयान सय्यद-१५०० मी.धावणे द्वितीय,गडाख प्रविण ११०मी.हडल्स द्वितीय व थाळीफेक तृतीय,वदक रोहीत-तिहेरी उडी प्रथम,४०० मी हडल्स-जामदार श्रेयस प्रथम व शेख अबुजर द्वितीय.४/१०० रिले रेस मुले व मुली तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.विजय खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
कॅदरम्यान वरील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे खेळाडू अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दरम्यान वरील सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे,सचिव ॲड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ.अभिजीत नाईकवाडे,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.बी.आर. सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.व विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे शा.शि.संचालक डॉ.सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे यांनी मार्गदर्शन केले होते.