जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

कोपरगावात मोकाट प्राण्यांचा उपद्रव वाढला,बंदोबस्त करा-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात मोकाट प्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नुकत्याच दोन घटनात दोन जण जखमी झाले असून अनेकांचा अनेक अपघात होत असून आपले जीवित व आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.या मोकाट प्राण्याचा कोपरगाव नगरपरिषदेने त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी राष्ट्रवादिचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी केली आहे.

दोन्ही छायाचित्र संकल्पित.

एका घटनेत सुभाषनगर येथील महिलेला डुकराने चावा घेतला होता.त्यात दोन्ही पोटऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती.सदर महिलेला उपचारासाठी येथे इंजेक्शन नसल्याने नगर येथील रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर इंदिरापथ मार्गावर सकाळ प्रहरी फिरत असताना एका मोकाट गाईने संजीवनीं महाविद्यालयांत कार्यरत असलेले प्रा.संतोष रामराव नवले यांना मारले आहे.त्या शिवाय राममंदिराजवळ अजय रेडिमेडचे संचालक अमित पोरवाल यांनाही सेवा निकेतन नजीक याच गायीने प्रसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे त्यामुळे या मोकाट प्राण्यांची शहरात दहशत पसरली आहे.

कोपरगाव शहराचा समावेश केंद्र सरकारच्या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या विविध पुरस्कारात झाला आहे.या योजनेनुसार व त्या योजनेच्या निर्देशानुसार,शहर इतर अनेक उपक्रमांबरोबर मोकाट जनावरे व डुक्करमुक्त करणे बंधनकारक आहे; परंतु याबाबतीत दररोज वर्तमानपत्रात बातम्या प्रसिद्ध होऊनही कोपरगाव पालिकेला जाग येत नाही.डुकरे पकडणे व भटकी कुत्री पकडण्यासाठी नगरपालिका बऱ्याच वेळा निविदा काढून ठेकेदार नेमते; परंतु त्यांची संख्या कमी झालेली दिसत नाही.नगरपालिकेने या डुकरे सोडणाऱ्या व मोकाट जनावरांच्या मालकांवर कठोर कारवाई करावी.शहरातील जनावरांचे गोठे शहराबाहेर हलवावेत.डुकरे पकडून जंगलात सोडावीत.कार्यवाहीला गती देऊन खास पथक नेमावे.मोकाट जनावरांमुळे रस्त्यावर अपघातही होतात व घाणही पसरते; तसेच अनेक वेळा वाहतूक कोंडीही होत आहे.

नुकत्याच एका घटनेत सुभाषनगर येथील महिलेला डुकराने चावा घेतला होता.त्यात दोन्ही पोटऱ्यांना गंभीर दुखापत झाली होती.सदर महिलेला उपचारासाठी येथे इंजेक्शन नसल्याने नगर येथील रुग्णालयात दाखल केले होते.त्यानंतर इंदिरापथ मार्गावर सकाळ प्रहरी फिरत असताना एका मोकाट गाईने संजीवनीं महाविद्यालयांत कार्यरत असलेले प्रा.संतोष रामराव नवले यांना मारले आहे.त्या शिवाय राममंदिराजवळ अजय रेडिमेडचे संचालक अमित पोरवाल यांनाही सेवा निकेतन नजीक याच गायीने प्रसाद दिला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.या दोघांनाही कोपरगाव येथील खाजगी रुग्णलयात उपचार घ्यावे लागले आहे.आर्थिक भुर्दंड पडला तो वेगळाच आहे.मात्र दैव बलवत्तर जीव वाचला हे नशीब !

कोपरगाव शहरातील मोकाट जनावरांविरोधात काही कारवाई सुरू आहे,असे अजिबात दिसत नाही.त्यामुळे शहरभर मोकाट जनावरे फिरताना दिसतात.डुकरांचे मालक डुकरांना ओढ्यात किंवा कचऱ्याचे ढीग असणाऱ्या ठिकाणी सोडतात.ही डुकरे माती उकरतात,भुसभुशीत करतात.नगरपालिकेने जनावरे किंवा डुकरांच्या मालकावर खटला भरून,त्यांच्याकडून जास्तीत जास्त दंड वसूल करावा.त्यामुळे जरब बसून,कोणीही जनावरांना मोकाट सोडणार नाही अशी व्यवस्था करावी अशी मागणीही संदीप वर्पे यांनी शेवटी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close