गुन्हे विषयक
दुकान फोडले,५० हजारांची चोरी,कोपरगावात गुन्हा दाखल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेले छायाचित्रकार विजय सुनील गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ या दुकानांचा मागील दरवाजा तोडून आतील सुमारे ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यामुळे पढेगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्या ठिकाणी फिर्यादी विजय गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ नावाचे छायाचित्रकारीचे दुकान आहे.त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्याने दुकानांचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि.७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक,त्यास एच.पी.कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी.पी.यू. त्यास ८ जी.बी.रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स,असलेला जुना वापरता.तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यात धूनमधूनच भुरटे चोरटे आपले डोके वर काढत असून त्यांचा उपद्रव तालुका पोलिसांची डोकेदुखी ठरत आहे.अशीच घटना नुकतीच पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत घडली असून त्या ठिकाणी फिर्यादी विजय गोल्हार यांचे ‘हिंदवी फोटोग्राफी’ नावाचे छायाचित्रकारीचे दुकान आहे.त्यांच्या दुकानावर पाळत घेऊन अज्ञातच चोरट्याने दुकानांचे मागील दरवाजाचे कुलूप तोडून दि.७ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या सुमारास आतील ३० हजार रुपये किमतीचा संगणक,त्यास एच.पी.कंपनीचा २४ इंची स्क्रीन असलेला सी.पी.यू. त्यास ८ जी.बी.रँप, दोन हार्ड डीक्स ग्राफिक्स कार्ड्स,असलेला जुना वापरता.तर २० हजार रुपये किमतीचा एफसोन कंपनीचा प्रिंटर असा एकूण ५० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी गोल्हार यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञातच चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी प्रभारी पोलीस अधिकारी सुरेश आव्हाड यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.४४३/२०२२ भा.द.वि.कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील प्रभारी पोलीस निरीक्षक आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सी.बी.काळे हे करीत आहेत.