गुन्हे विषयक
दोघींचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत,कोपरगावात अकस्मात मृत्यूची नोंद
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला भाऊ मंगेश माणिक चव्हाण याकडे दिवाळी आणि भाऊबीजेसाठी आलेली बहीण अर्चना जगदिश सोनवणे (वय-३५) रा.वणी जि.नाशिक आणि एक भाची कु.गौरी शरद शिंदे (वय-१८) रा.म्हसरुळ नाशिक जिल्ह्यातून आल्या असता सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्या गोदावरी नदीवर धुणे धुण्यास व अंघोळ करण्यास गेल्या असता त्यांचा तोल जाऊन त्या पाण्यात पडल्या होत्या. त्यांना वाचविण्यास अन्य तिघीनी प्रयत्न केले मात्र सुदैवाने त्या वाचल्या असून यातील वरील दोघीना आपला जीव गमवावा लागला आहे.त्यामुळे या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दुर्दैवी मयत महिला अर्चना सोनवणे व कु.गौरी शिंदे आदी छायाचित्रात दिसत आहे.
वर्तमानात दिवाळी सण असल्याने नदीवर मासे धरणारे इसम नसल्याने त्यांना वाचविण्यास कोणीही जवळपास नव्हते त्यामुळे दोघीना आपला जीव गमवावा लागला आहे.सदर इसम असते तर हा अनर्थ टळला असता असे अनेकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संगीतले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,वर्तमान काळात दिवाळी सण मोठ्या उत्साहात संपन्न आला असून आज भाऊबीज होती.त्या निमित्त भावाला ओवाळण्यासाठी बहिणी येत असतात.हे दिशभरातील सार्वत्रिक चित्र आहे.दिवाळी हा वर्षांतील महत्वाचा सण असून यासाठी सुवासिणी आपल्या माहेरी आवर्जून जात असतात.त्याला कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव हेही अपवाद नव्हते.तेथील रहिवासी भाऊ मंगेश चव्हाण यांना ओवळण्यासाठी म्हसरुळ येथील बहीण अर्चना सोनवणे हि आली होती.त्याच बरोबर त्यांची मयत भाची कु.गौरी शरद शिंदे आदी सह अन्य नातेवाईक महिला या विविध ठिकाणाहून भाच्याही आल्या होत्या.भाऊबीज झाली असता त्यांनी गोदावरी नदीवर अंघोळ आणि धुनी धुण्याच्या निमित्ताने आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास गेल्या होत्या.त्यात पोहत असताना एकीचा पाय घसरून पडली असता तिला वाचविण्यासाठी तिच्या मावशीने नदीत उडी मारली असता त्या दोघीही पाण्यात वाहू लागल्या असता अन्य तिघीनी पाण्यात उड्या घेतल्या मात्र त्यातील बाकीच्यांनी हात देऊन वर काढले मात्र या पाच जणी पैकी अर्चना सोनवणे व कु.गौरी शिंदे याना वाचविण्यात त्यांना दुर्दैवाने अपयश आले आहे.
दिवाळी सण असल्याने नदीवर मासे धरणारे इसम नसल्याने त्यांना वाचविण्यास कोणीही जवळपास नसल्याने दोघीना आपला जीव गमवावा लागला आहे.अन्यथा हा अनर्थ टळला असता असे अनेकांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना संगीतले आहे.
या ठिकाणी झालेला आरडा ओरडा ऐकून बाकी नागरिकांनी नदीकडे धाव घेतली मात्र तोवर महत्वाची वेळ उलटून गेली होती.त्यांना तातडीने रुग्णवाहिका बोलावून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या दोघीना मृत घोषित केले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक धाकराव सहाय्यक फौजदार महेश कुसारे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.६६/२०२२ सि.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद दाखल केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री धाकराव हे करीत आहेत.