दळणवळण
नादुरुस्त नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग,नेते गप्प का ?…यांचा सवाल
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्ह्यातील रस्त्यांची पुरती वाट लागलेली असताना संबंधित ठेकेदार व अधिकारी आदींना कोणताही लोकप्रतिनिधी सवाल विचारायला तयार नाही याचे गौडबंगाल नेमके काय आहे ? असा कडवा सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकांव्ये विचारला आहे.
“पुर्वी बेताल अधिकारी व नादुरुस्त कामाबाबत माजी मंत्री शंकरराव कोल्हे,शंकरराव काळे,बाळासाहेब विखे आदी नेते कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांना कामाबद्दल जाहीर खडसावत असत.मात्र वर्तमानात नेते असे करण्यास कचरत आहे.वर्तमान लोकप्रतिनिधी आजी व माजी खासदार,आमदार हे अधिकाऱ्यांशी वैर घेण्याचे टाळत आहे.व त्यांची जाब विचारण्याची तयारी दिसत नाही.याबाबत जिल्ह्यात उलटसुलटच चर्चेला उधाण आले आहे.यात काही गौड बंगाल तर नाही ना..?-नितीन शिंदे,सरचिटणीस,प्रदेश काँग्रेस.
कोपरगाव ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी व १६० चे रस्ता दुरुस्तीचे काम सध्या मंदगतीने चालू आहे.या कामासाठी जड वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आलेली आहे.या महामार्गाचे डागडुजीचे काम ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे तसे अपेक्षेप्रमाणे का होत नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकारी,कॉन्ट्रॅक्टर आदींना जाहीरपणे विचारलेला आहे.वारंवार दुरुस्ती करताना शासनाचा अमाप पैसा खर्च होत आहे.हे काम उत्कृष्ट दर्जाचे जर केले तर लोकांना मनस्ताप होणार नाही आणि पैसाही वाचेल,पण लोकप्रतिनिधींचा कॉन्ट्रॅक्टर शासकीय अधिकारी यांच्यावर कोणाचीही अंकुश नाही हे कडवे वास्तव आहे.या बाबत जिल्ह्यातील नागरिक व कार्यकर्त्यांत शंका निर्माण होत आहे.पुर्वी माजी मंत्री शंकरराव कोल्हे,शंकरराव काळे,बाळासाहेब विखे आदी नेते कॉन्ट्रॅक्टर व अधिकारी यांना कामाबद्दल जाहीर जाबसाल करत असत.मात्र वर्तमानात नेते असे करण्यास कचरत आहे.वर्तमान लोकप्रतिनिधी आजी व माजी खासदार,आमदार हे अधिकाऱ्यांशी वैर घेण्याचे टाळत आहे.व त्यांची जाब विचारण्याची तयारी दिसत नाही.याबाबत जिल्ह्यात उलटसुलटच चर्चेला उधाण आले आहे.यात काही गौड बंगाल तर नाही ना..? अशी शंका सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेली आहे.कारण एखादा शासकीय कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याच्या कार्यक्रमाला यांची उपस्थिती हमखास असती पण रस्ता व महामार्गाबाबत च्या निकष व कामाबद्दल लोकप्रतिनिधी काहीही बोलतांना व जाब विचारताना दिसत नाहीत.हे सर्व काही शंका घेण्यासारखेच आहे.हा राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे गुणवत्ते बाबत खासदार विखे व खा.लोखंडे यांनी अधिकाऱ्यांना व कॉन्ट्रॅक्टरला जाब विचारावा हे सर्व सामान्यांना अपेक्षित आहे.तसेच आजी-माजी आमदार आदीनी ही याबाबत मौन धरून बसू नये ?असे आवाहन शिंदे यांनी केले आहे.
अ.नगर-कोपरगाव हा रस्ता पूर्वी जागतिकी बँकेकडे वर्ग होता आता तो सन-२०१३ नंतर राष्ट्रीय महामार्ग झालेला आहे.त्यातच चारशे कोटीचे बजेट आता चौदाशे कोटी पर्यंत गेलेलं आहे.हे सर्व सामान्य माणसाला,अचंबित करणारी आकडेवारी आहे.त्याचे काम उत्कृष्ट दर्जाचे व्हावे यासाठी लोकप्रतिनिधींनी कॉन्ट्रॅक्टर व अधिकाऱ्यांवर अंकुश ठेवावा अशी रास्त अपेक्षा व मागणी प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस नितीन शिंदे यांनी शेवटी केली आहे.