कोपरगाव शहर वृत्त
जगातील कोणताही धर्म तुम्हाला द्वेष-विद्वेष शिकवत नाही-पोलीस निरीक्षक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जगातील कोणताही धर्म तुम्हाला द्वेष आणि विद्वेष शिकवत नाही असे प्रतिपादन कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी कोपरगाव शहर ठाण्यातील सभागृहात एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.
“एकाच धर्माचे देश असूनही इराक-ईराण यांचे युद्ध झाले आहे.पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात वर्तमानात कुरबुरी चालू आहे.आर्मेनिया आणि अजरबैजान या शत्रू राष्ट्राचे युद्ध तर नुकतेच संपन्न झाले व पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.मात्र भारताची लोकसंख्या १२५ कोटी असूनही त्यात हिंदू आणि मुस्लिम यांचेसह सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात हे फक्त भारतात घडते हि भारतीय संस्कृती आहे”-वासुदेव देसले,पोलीस निरीक्षक कोपरगाव शहर पोलीस ठाणे.
ईद-ए-मिलाद म्हणजे ‘अल्लाह ‘चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस.जगभर ‘ ईद-ए-मिलादुन्नबी’ हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबीअव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठया उत्साहात साजरा केला जातो.मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण म्हणजे ईद उल फितर व दुसरी ईदुज्जुह.ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते.आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाने साजरा केला जाणारा सण अशी त्याची ओळख आहे.याउलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.कोपरगावात हा सण मुस्लिम बांधव मोठ्या उत्साहात संपन्न करण्याची परंपरा आहे.या वर्षीही हे सण उत्साहात संपन्न व्हावेत या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यातील सभागृहात आज सकाळी अकरा वाजता शहर पोलिसांनी मुस्लिम मौलाना,जेष्ठ कार्यकर्ते आदी बांधवांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,मौलाना असिफ मिल्ली, मौलाना निसार,रियाज शेख,माजी नगर सेवक मेहमूद सय्यद,फकीर कुरेशी,अजीज शेख,तौफिक मणियार,हाजी सलीम,पोलीस कॉ.राम खारतोडे आदिसंह बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”कोणताही धर्म नागरिकांना द्वेष शिकवत नाही.रस्त्यावर अपघात झाल्यावर कोणीही धर्म पाहून मदत करत नाही.ईश्वर हा एकच असून त्याचीच सर्व लेकरे आहे.तो कोणताही भेदभाव करत नाही.तर आपण तो का करावा असा उपदेश त्यांनी केला आहे.एकाच धर्माचे देश असूनही इराक-ईराण यांचे युद्ध झाले आहे.पाकिस्तान अफगाणिस्तान यांच्यात वर्तमानात कुरबुरी चालू आहे.आर्मेनिया आणि अजरबैजान या शत्रू राष्ट्राचे युद्ध तर नुकतेच संपन्न झाले व पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.मात्र भारताची लोकसंख्या १२५ कोटी असूनही त्यात हिंदू आणि मुस्लिम यांचेसह सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात हे फक्त भारतात घडते हि भारतीय संस्कृती आहे.सर्व धर्मियांना सामावून घेण्याची ताकद भारतात आहे.हे जगातील एकमेकाद्वितीय उदाहरण आहे.समाजाचे हितशत्रू तुम्हाला लढवत ठेवून आपले स्वार्थ साधून घेतात त्यांना बळी पडू नका व आपले सण उत्सव शांततेत पार पाडा असे आवाहन पोलीस निरीक्षक देसले यांनी शेवटी केले आहे.
सदर कार्यक्रमाचे प्रास्तविक पोलीस उपसनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी केले आहे.तर उपस्थितांचे आभार पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी मानले आहे.