कोपरगाव शहर वृत्त
विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेत नाव कमवावे-डॉ.मुळे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
वर्तमानात विद्यार्थ्यांनी जिद्दीने,ध्येयाने शिक्षण घेऊन यशोशिखर गाठावे,थोडे कष्ट घेतले तर नक्कीच यश संपादन होऊ शकते असे प्रतिपादन कोपरगाव येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. दत्तात्रय मुळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे.
“विद्यार्थी मेहनती,जिद्दी,आज्ञाधारक असावा.शिक्षकांच्या शिकविण्याकडे लक्ष देत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे”-दिलीप वाबळे,कोपरगाव.
कोपरगाव येथील जेष्ठ नागरिक सेवा मंच,जेष्ठ महिला समितीच्या वतीने कोपरगाव नगरपालिका शाळा नंबर एक मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.समारंभाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सुधाभाभी ठोळे या होत्या.
सदर प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून सौ.मुळे,उद्योजक दिलीप वाबळे,मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब,डॉ.विलास आचारी,वृत्तपत्र छायाचित्रकार हेमचंद्र भवर,शाळेच्या शिक्षिका,शिक्षक,विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी दिलीप वाबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,”विद्यार्थी मेहनती,जिद्दी,आज्ञाधारक असावा.शिक्षकांच्या शिकविण्याकडे लक्ष देत आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.जेष्ठ नागरिक सेवा मंच जेष्ठ महिला समितीच्या वतीने अनेक शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे.त्याचे सार्थक झाले पाहिजे.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक मुख्याध्यापिका सौ.तरवडे यांनी केले.तर जेष्ठ नागरिक संघाच्या कार्याचा आढावा जेष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराथी यांनी सादर केला आहे.उपस्थितांचे आभार उत्तम शहा यांनी मानले आहे.