जगावेगळे
कोपरगावात महात्मा गांधी जयंती निमित्त जवांनाचा गौरव
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
भारतीय जनता पार्टी (वसंत स्मृती कार्यालय) च्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ हा सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे.त्याचबरोबर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व स्व.लाल बहाद्दूर शास्त्रीजी यांचे जयंती निमित्त कोपरगाव शहरातील धाडसी युवक-सध्या सेनादलात कार्यरत असलेले जवान सुलतान सय्यद यांचा व त्यांच्या माता पित्यांचा सन्मान त्यांच्या निवासस्थानी करण्यात आला आहे.
“कोपरगावचा भूमिपुत्र सुलतान सय्यद सीमेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस निधडया छातीने उभा आहे.कुठल्याही नगराध्यक्ष-आमदार-खासदार,नामदार यांच्यापेक्षा सीमेवर उभा असलेला ‘सुलतान’ हाच सर्वांचा ‘खरा हिरो’ आहे”-विजय वहाडणे,माजी नगराध्यक्ष,कोपरगाव नगरपरिषद.
सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे,शहराध्यक्ष विनायक गायकवाड,प्रभाकर वाणी,विजय बडजाते,विनीत वाडेकर,संजय कानडे,संजय कांबळे,नंदकुमार जोशी,सुरेश कांगोणे,किरण थोरात,रविंद्र बागरेचा,वसंत जाधव,योगेश वाणी,मन्नू कृष्णानी,सादिक शेख,विजय जोशी,प्रकाश सवाई आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना विजय वहाडणे यांनी कोपरगावचा भूमिपुत्र सुलतान सय्यद सीमेच्या रक्षणासाठी रात्रंदिवस निधडया छातीने उभा आहे.कुठल्याही नगराध्यक्ष-आमदार-खासदार,नामदार यांच्यापेक्षा सीमेवर उभा असलेला ‘सुलतान’ हाच सर्वांचा ‘खरा हिरो’ आहे असे गौरवोद्गार काढले आहे.समाजसेवक संजय काळे,आदिनाथ ढाकणे आदी निःस्वार्थ समाजसेवकां प्रमाणेच ‘सुलतान’ ची निरपेक्ष सेवा हा आपल्या कोपरगावची शान आहे असे प्रतिपादन केले आहे.
सदर प्रसंगी संजय कांबळे यांनी प्रास्ताविक तर विनायक गायकवाड यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.