सहकार
श्री गणेश सहकारी कारखान्याच्या संचालकांनी उत्तरे द्यावीत-…या नेत्याची मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
राहाता तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री गणेश सहकारी साखर कारखाण्याची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि.२४ सप्टेंबर रोजी संपन्न होत असून यात या कारखान्याने जो अहवाल प्रसिद्ध केला आहे.त्यात ज्या शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत.त्याची उत्तरे संचालक मंडळाने द्यावीत असे जाहीर आवाहन नगर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ.एकनाथ गोंदकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकांन्वये केले आहे.
‘ड्यु ड्युलन्स’ अहवालानुसार कारखाण्याचा प्रत्यक्ष तोटा १०७ कोटी रुपये असल्याचे प्रमाणित केले आहे.कारखाना करारावर देताना तो ९३ कोटी होता.हि तफावत १४ कोटिं रुपयांची आहे.हि कोणामुळे व कशामुळे निर्माण झाली आहे.सन-२०१३-१४ पर्यंत झालेले लेखा परीक्षण हे चुकीचे होते का ? हे लेखा परीक्षण चूकीचे आहे तर या चुकीबद्दल अगर दोषाबद्दल कर्तृत्वात कसुर केल्या बद्दल संबंधितांवर लेखा परीक्षण चुकीचे केल्याच्या कारवाई बद्दल ठराव करावा”-डॉ.एकनाथ गोंदकर,जिल्हा उपाध्यक्ष काँग्रेस.
त्या प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटलं आहे की,”श्री गणेश सहकारी साखर कारखाण्याचा २०२१-२२ चा वार्षिक अहवाल पाहता अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.सण-२०१३-१४ मध्ये कारखाना सहभागी तत्त्वावर देताना ९३.०१ कोटी तोटा होता.तर २०२१-२२ च्या अहवालात तोच तोटा ७०.९८ कोटी शिल्लक दिसत आहे.म्हणजेच आठ वर्षात २२.०३ कोटी कमी झालेला आहे.प्रत्यक्षात हि माहिती पाहता डॉ.विखे कारखान्याने ३३.३३ कोटी रुपये भरणा केलेला आहे.१८ कोटी ४१ लाख १५ हजार ३६ रुपये श्री गणेश कारखान्याकडे अनामत आहे.म्हणजेच श्री गणेश कारखान्यास २०२१-२२ वर्षा अखेर ५१ कोटी ७४ लाख ९४ हजार ०३६ रुपये मिळाले आहे.प्रत्यक्ष मात्र २२.०३ कोटी तोटा कमी झालेला आहे.उर्वरित २९ कोटी ७१ लाख ९४ हजार ०३६ रुपये या रकमेचा हिशोब काय ? हे काही कळत नाही याचा संचालक मंडळाने खुलासा करणे गरजेचे आहे.
सन-२०२१-२२ च्या अहवालानुसार बेणे विक्री येणे,कारखाना सभासद वसुली व इतर येणे ९ कोटी ४१ लाख ०४ हजार ४६५ रुपये आहे.संचालक मंडळाने पाच वर्षात सदरची रक्कम वसुल का केली नाही ? हि रक्कम कोणाकडे आहे ? हा सवाल निर्माण होत आहे.
‘ड्यु ड्युलन्स’ अहवालानुसार कारखाण्याचा प्रत्यक्ष तोटा १०७ कोटी रुपये असल्याचे प्रमाणित केले आहे.कारखाना करारावर देताना तो ९३ कोटी होता.हि तफावत १४ कोटिं रुपयांची आहे.हि कोणामुळे व कशामुळे निर्माण झाली आहे.सन-२०१३-१४ पर्यंत झालेले लेखा परीक्षण हे चुकीचे होते का ? हे लेखा परीक्षण चूकीचे आहे तर या चुकीबद्दल अगर दोषाबद्दल कर्तृत्वात कसुर केल्या बद्दल संबंधितांवर लेखा परीक्षण चुकीचे केल्याच्या कारवाई बद्दल ठराव करावा त्यामुळे व्यवस्थापनातील दोष समोर येतील.
करारापोटी श्री गणेश कारखान्यास भरणा केलेली रक्कम हि गणेश कारखाण्याचे उत्पन्न दाखवले जाते.त्यामुळे नफा झाल्याचे दिसत आहे.यातून सभासदांची दिशाभूल केली जात आहे.आकडेवाडी नुसार तोटा कमी झालेला दिसत नाही.म्हणजेच केवळ कागदोपत्री मेळ जुळलेला दिसत आहे.
वरील सर्व मुद्द्यांची सुस्पष्ट उत्तरे संचालक मंडळाने सभासदांना वार्षिक सभेत द्यावीत अशी मागणी सभासदांच्या वतीने डॉ.एकनाथ गोंदकर यांनी केली आहे.