सामाजिक उपक्रम
कोपरगाव तालुक्यातील चालकांसाठी…हे तपासणी शिबिर होणार

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या वतीने रविवार दि.१८ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास येसगाव टोल नाक्याजवळ ‘हॉटेल डिसें’ट या ठिकाणी ‘चालक दिन’ साजरा करण्यात येत असून त्या निमित्ताने उपस्थित चालकांसाठी ‘मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर’ आयोजित केल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
“देशातील नागरिकांना आपल्या जीवनावश्यक वस्तू वेळेवर भेटतात.व पाकिस्तान सारखा तुटवडा भासत नाही.कोरोना काळात या गोष्टीचे महत्व नागरिकांना निर्विवाद पटलेले आहे.त्यामुळे या देशातील चालक-मालक हे देशाची मोठी देशसेवा करतात हे स्पष्ट दिसून आले आहे.मात्र या घटकांचा म्हणावा असा सन्मान होत नाही हे दुर्दैव आहे.म्हणून त्यांना योग्य सन्मान मिळावा त्यांची पिळवणूक थांबवावी यासाठी परिवहन विभागाने या घटकांचा सन्मान व्हावा यासाठी चालक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे”
देशाच्या दळणवळण क्षेत्रात वाहन चालक-मालकांचे मोठे योगदान आहे.त्यामुळे देशातील नागरिकांना आपल्या जीवनावश्यक वस्तू वेळेवर भेटतात.व पाकिस्तान सारखा तुटवडा भासत नाही.कोरोना काळात या गोष्टीचे महत्व नागरिकांना निर्विवाद पटलेले आहे.त्यामुळे या देशातील चालक-मालक हे देशाची मोठी देशसेवा करतात हे स्पष्ट दिसून आले आहे.मात्र या घटकांचा म्हणावा असा सन्मान होत नाही हे दुर्दैव आहे.म्हणून त्यांना योग्य सन्मान मिळावा त्यांची पिळवणूक थांबवावी यासाठी परिवहन विभागाने या घटकांचा सन्मान व्हावा यासाठी चालक दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे हा चालक दिन कोपरगाव तालुक्यात साजरा करण्याचा निर्णय कोपरगाव चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनने घेतला आहे.
त्यासाठी संघटनेने कोपरगाव तालुक्यात येसगाव ग्रामपंचायत हद्दीत नगर-मनमाड रोडलगत हॉटेल रिसेन्ट या ठिकाणी हा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला असून त्या निमित्ताने उपस्थित चालकांची वैद्यकीय तपासणी शिबिर,व नेत्र तपासणी शिबिर आयोजित केले आहे.
त्याचा या मार्गावरील चालक व मालक व ट्रान्सपोर्ट व्यवसायिक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कोपरगाव चालक-मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष आयुबभाई कच्छी,उपाध्यक्ष भारत वैद्य,सचिव शैलेश रावल यांनी केले आहे.
_______________________________________________________