जगावेगळे
‘लकडे’ बाबांचे “काकप्रेम” पितृ पक्षात चर्चेचा विषय
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
वर्तमानात पितृ श्राद्ध पंधरवाडा सुरु आहे़.हिंदू धर्मात पितरांचे ऋण व्यक्त करण्याचे हे दिवस असतात त्यामुळे रोजच कोणाच्या तरी घरापुढे पितरांना जेऊ घालण्यासाठी धडपड सुरु असल्याचे दिसते.एरवी हातातील घास घेऊन पळणारा कावळा मात्र येण्याचे नाव घेता घेत नाही असे दृश्य सार्वत्रिक असल्याचे दिसत आहे.मात्र कोळपेवाडी येथे मात्र एक इसम असा आहे की त्याच्या अंगाखांद्यावर बसून कावळे मिष्टान्न खाताना देवदुर्लभ चित्र दिसत आहे.याची कोळपेवाडीसह तालुक्यात सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.त्यांचे नाव ‘लकडे बाबा’.
पितृपक्षाच्या पंधरवाड्यात पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्यांना अन्न दिले जाते.अन्नाला काकस्पर्श झाल्यानंतर पितरांना पोहोचलं असा हिंदू परंपरेत समज आहे.मात्र बऱ्याच वेळा कावळ्याची प्रतीक्षा करूनही कावळा बऱ्याच वेळा हजेरी लावत नाही.त्यामुळे अनेकांना नाईलाजाने गायीस घास भरवावा लागत असल्याचे दिसत आहे.मात्र कोळपेवाडीत ‘लकडे’ बाबांची तऱ्हाच न्यारी ते आपल्या नियत वेळी घराच्या बाहेर आले की त्यांच्या अंगाखांद्यावर बसणारे कावळे हि नित्याची बाब झाली आहे.त्याची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.
कावळा हा रंगाने काळा असतो.कावळा माणसाच्या वसाहतीजवळ राहणारा पण घरात न येणारा, परिचित पक्षी आहे.हा पक्षी अत्यंत चलाख,सावध,चपळ खाण्यासाठी विशिष्ट आवड नसलेला,मृतभक्षी आहे.मानेजवळचा भाग राखाडी रंगाचा तर उर्वरीत काळ्या रंगाचा एक पक्षी आहे.नर-मादी दोन्ही दिसायला सारखेच असतात.तर संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा असे म्हणतात.तसेच याला हुशार पक्षी म्हणून ओळखतात.कावळ्याला दोन डोळे असतात.त्याला ‘एकाक्ष’ असेही म्हणतात.याला हाताळणे एवढी सोपी गोष्ट नाही मात्र हि कला साध्य केली आहे ती ‘लकडे बाबांनी’.
हिंदू धर्मात पितृ पक्षाला विशेष महत्त्व आहे.धार्मिक मान्यतांनुसार जेव्हा आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो,तेव्हा तो पितृदेवाचे रूप धारण करतो आणि त्याच्या वंशजांचे रक्षण करतो. पितृदेवाच्या पूजनासाठी पितृ पक्ष समर्पित आहे.या वर्षी पितृ पक्ष १० सप्टेंबर २०२२ पासून सुरु होत आहे.तर २५ सप्टेंबर २०२२ रोजी पितृ पक्ष समाप्ती होईल.
‘पितृ पक्ष’ पितरांना पिंड दान करण्यासाठी समर्पित आहे.कुंडलीत पितृ दोष असेल तर त्याच्या निवारणासाठी पितृ पक्षात केलेले उपाय फार प्रभावी ठरतात.या काळात पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कावळ्यांना अन्न दिले जाते.अन्नाला काकस्पर्श झाल्यानंतर पितरांना पोहोचलं असा हिंदू परंपरेत समज आहे.मात्र बऱ्याच वेळा कावळ्याची प्रतीक्षा करूनही कावळा बऱ्याच वेळा हजेरी लावत नाही.त्यामुळे अनेकांना नाईलाजाने गायीस घास भरवावा लागत असल्याचे दिसत आहे.मात्र कोळपेवाडीत ‘लकडे’ बाबांची तऱ्हाच न्यारी ते आपल्या नियत वेळी घराच्या बाहेर आले की त्यांच्या अंगाखांद्यावर बसणारे कावळे हि नित्याची बाब आहे.
लकडे याचे पूर्ण नाव,’चंद्रकांत हरिभाऊ लकडे’ एकदम साधारण व्यक्तिमत्व,कपाळाला गंध नाही की टिळा.ते कोळपेवाडी आणि परिसरात ‘लकडे बाबा’ नावाने ते सुपरिचित.कोळपेवाडी गावकुसाला त्यांची शेती.त्यातच वनराईने नटलेली वस्ती.या वनराईत पशु पक्ष्यांचा मुक्त संचार. लकडे बाबा सांगतात, ‘आपले सण-उत्सव धार्मिक विधी हे निसर्गातील प्रत्येक गोष्टींशी निगडीत असतात.निसर्गाने,पशुपक्ष्यांनी मानव जातीवर जे उपकार केलेले असतात,त्याची परतफेड करण्याचा प्रयत्न सण,उत्सवांतून होत असतो़.त्यातूनच बैलाची पोळ्याला पूजा केली जाते व पितृ पक्षात कावळ्याला मान दिला जातो.कावळ्याला पितरांची उपमा त्यातूनच दिलेली आहे.पितृ पक्षात अथवा दशक्रिया विधीत अन्नदान केले जाते़ या अन्नदानावर पशुपक्ष्यांचाही अधिकार असतो़ म्हणून कावळ्याला हा मान दिला जातो़’
माणसाच्या सावलीलाही भिणारा कावळा थेट ‘लकडे बाबां’च्या मांडीवर बसून ताटातील अन्न खातो़. कावळ्यांचा एवढा तुमचा लळा कसा लागला ? याबाबत विचारणा केली असता त्यांनी,”यासाठी वर्ष दीड वर्ष लागले़ विहिरीच्या कडेला एक मोठ्ठे झाड आहे़.त्यावर कावळ्याचा खोपा होता.त्यात दोन पिल्ले होती़ एक दिवस कावळा घरट्यात नसताना कोकीळने कावळ्याचे पिल्लू लोटून दिले.हा प्रकार माझ्या लक्षात आला.पिलाला स्पर्श न करता मी ते कापडी पिशवीत घालून त्याला अलगद खोप्यात सोडले.तोच हा कावळा़ त्याचे आता स्वतंत्र कुटुंब आहे.हळूहळू हे माझ्या जवळ आले.आता हे अगदी माझ्या अंगा-खांद्यावर येऊन बसतात.ताटातील अन्न खातात.पण मी बाहेर असलो तरच ते हे कृती करतात हे विशेष ! मी बाहेर असलो त्याच वेळी ते माझ्या जवळ येतात़ घरात ते कधीच येत नाहीत.म्हणून कावळ्याला हा मान दिला जातो़’ सृष्टीतील सर्व पशुपक्षी हे एकाच ईश्वराची लेकरे आहेत.याच भारतीय परंपरेचा संदेश हे लकडे बाबा देत तर नाही ना ! नक्कीच हि बाब मानला संतोष देणारी आणि अंतर्मुख करणारी आहे हे नक्की.यातून एखाद्याने पितृपक्षात व दशक्रिया विधीत कावळ्याचा काकस्पर्श करण्याची नामी प्रेरणा घेऊन (शक्कल) दहावे आणि श्राद्धाच्या निविदा न काढल्या म्हणजे कमावली !