विशेष दिन
राहता तालुक्यात…या ठिकाणी शिक्षक दिन साजरा

न्यूजसेवा
बाभळेश्वर-(प्रतिनिधी)
स्वतंत्र भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनी सर्व भारतामध्ये शिक्षक दिन साजरा केला जातो.शिक्षक दिनाचे औचित्य साधून पाच सप्टेबरच्या पूर्वसंध्येला रविवारी बाभळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समितीच्या वतीने शिक्षक दिनाचा कार्यक्रम लोणीचे पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो.शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथे हा दिन एक दिवस आधी उत्साहात संपन्न झाला आहे.
यावेळी राहात्याचे शिक्षणविस्तार अधिकारी संजीवन दिवे,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तान्हाजी बेंद्रे,पोलीस पाटील अण्णासाहेब बेंद्रे,शिवाजी बेंद्रे यांची भाषणे झाली.उपस्थित शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला.
सदर प्रसंगी पंचायत समितीचे उपसभापती बबलू म्हस्के,सोसायटीचे अध्यक्ष दौलत बेंद्रे, उपसरपंच अजित बेंद्रे,अमृत मोकाशी,अनिल म्हस्के,शंकरराव बेंद्रे,प्रमोद बनसोडे,अॅड.प्रकाश बेंद्रे,शंकर रोकडे,प्रकाश हुंडेकरी,दादा पठारे,बाळासाहेब मेहेर,प्रभाकर बेंद्रे,प्रल्हाद बेंद्रे, प्रा.डॉ.अनिल बेंद्रे,अविनाश साठे,राजू मोकाशी,अजित ब्राम्हणे,अशोक थोरात,शिवसेनेचे सोमनाथ गोरे,दीपक म्हसे,सतीश आहेर,राजू मकासरे,आर.डी.कदम,किशोर पारखे,अमोल आल्हाट,शरद चेचरे, संदीप राऊत, रमेश सत्रे, राहुल कटारिया,राजू गदिया आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद तोरणे यांनी केले तर प्रास्ताविक गोरक्षनाथ बनकर यांनी मांडले आणि शेवटी आभार प्रदर्शन माहिती अधिकार संघर्ष समितीचे अध्यक्ष गोरख गवारे यांनी केले आहे.