कोपरगाव तालुका
सत्ताबद्दल झाला तरी तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही-आश्वासन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जरी राज्यात सत्ताबद्दल झाला असला तरी श्री क्षेत्र मयुरेश्वर देवस्थानाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे यांनी पोहेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना दिले आहे.
“आपण केलेल्या पाठपुराव्यातून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे.परंतु मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अजूनही विकास कामांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यासाठी पाठपुरावा सुरु असून येत्या काही दिवसात त्या विकासकामांना देखील मंजुरी मिळणार आहे”-आ.आशुतोष काळे,अध्यक्ष साईबाबा संस्थान शिर्डी.
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे कामाचे भूमिपूजन नुकतेच त्यांचे हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी अशोक रोहमारे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे,वसंतराव आभाळे,शंकरराव चव्हाण,प्रविण शिंदे,माजी संचालक सचिन रोहमारे,सुनील शिंदे,संजय रोहमारे,रोहिदास होन,राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा वैशाली आभाळे,संदीप रोहमारे,बाबासाहेब रोहमारे,नंदकिशोर औताडे,मधुकर औताडे,हरिभाऊ जावळे,विजय रोहमारे,योगेश औताडे,सुनील वर्पे,पंचायत समिती शाखा अभियंता लाटे,गायकवाड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते
त्यावेळी पुढे ते म्हणाले की,”आपण केलेल्या पाठपुराव्यातून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध झाला आहे.परंतु मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी अजूनही विकास कामांचे प्रस्ताव शासनदरबारी मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.त्यासाठी पाठपुरावा सुरु असून येत्या काही दिवसात त्या विकासकामांना देखील मंजुरी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.’श्री मयुरेश्वर देवस्थानास’ ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी आ.काळे यांचे यावेळी आभार मानले आहे.