कोपरगाव तालुका
लायन्स मूक बधिर विद्यालयास स्थैर्य लाभले याचे समाधान-..या नेत्याचे प्रतिपादन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
“लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालय सुरु करताना परिसरातील शेतकरी,उद्योजक,डॉ.सोमैया,श्री.साईबाबा संस्थान शिर्डी,आदी अनेकांचे बहुमोल सहकार्य लाभले आज हे विद्यालय विकासाच्या मोठ्या टप्प्यावर उभे असल्याचे समाधान असल्याचे प्रतिपादन अशोक रोहमारे यांनी एका कंर्यक्रमात बोलताना केले आहे.
“साकरवाडी येथे आपण शिक्षण घेतले व सोमैया महाविद्यालय परिवाराशी माझे पूर्वीपासूनच स्नेह-संबंध आहेत.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव प्रसंगी आपण लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाच्या विद्याथर्यांच्या गणवेशासाठी ४० हजार रुपये व येथे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांपैकी गुणवंत व आर्थिक स्थिती कमकुवत असलेल्या ५ विद्यार्थ्यांसाठी २० हजार रु.देणगी जाहीर करतो”-प्रकाश दारके,प्रमुख अतिथी.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला आहे.पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळाला आहे.कोपरगाव शहरासह तालुक्यात देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.कोपरगाव येथील शैक्षणिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या के.जे.सोमैय्या महाविद्यालयांत हा उत्साह पाहायला मिळायला आहे.त्या प्रसंगी ते बोलत होते.
सदर प्रसंगी संस्थेचे सचिव अँड.संजीव कुलकर्णी,विश्वस्त जवाहरलाल शहा,अँड.संजय भोकरे, सुधीर डागा,लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत,सचिव बाळासाहेब जोरी,लिओ क्लबचे अध्यक्ष सुनील सिनगर,महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,प्राध्यापकेत्तर सेवक,लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे शिक्षक व सेवक,छात्रसैनिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
सदर प्रसंगी दिनार कुदळे व अँड.राहुल रोहमारे महाविद्यालयाच्या विकास समितीचे सदस्य प्रवीण शिंदे,वसंतराव आभाळे यांचा कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कोळपेवाडीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला तसेच सागर जाधव यांची भारतीय सैन्यात भरती झाल्याबद्दल,दिव्या बोरसे, वैष्णवी राऊत,सादिया तांबोळी (प्रथम क्रमांक),मयूर कोकाटे (द्वितीय क्रमांक),आरती जगताप चतुर्थ क्रमांक मिळवल्याबद्दल याशिवाय कोपरगाव मुलींच्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभाग व यश प्राप्त केल्याबद्दल सत्कार करण्यात आला आहे.
सदर प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्तविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.डॉ.एस.के.बनसोडे व श्री डुकरे यांनी केले तर प्रसंगी लायन्स मूक बधिर व अपंग विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्री.गुरसळ यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.