कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या महाविदयालयात स्वातंत्र्य दिन संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात ७५ वा भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव डॉ.विकास जामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
“के.बी.रोहमारे महाविद्यालयातील विद्यार्थी हे सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना दिसत आहेत तसेच आजचा तरुण हा उद्याचा भारत घडविणार आहे म्हणून तरुणांनी देश प्रेम व देशसेवा हे गुण अंगीकारावे”-रामभाऊ गाडे,चासनळी,ता.कोपरगाव.
भारतात यंदा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा येत आहे. आज पंधरा ऑगस्ट यंदा भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली आहेत.देशभरात स्वातंत्र्य दिनाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.कोपरगाव तालुक्यासह देशभरात विविध देशभक्तिपर उपक्रम आणि अभियान राबवण्यात येत आहेत.चासनळी येथेही के.बी.रोहमारे या कनिष्ठ महाविद्यालयात हा उत्साह पाहायला मिळायला आहे.
सदर प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चासनळी येथील स्थानिक शालेय शिक्षण समितीचे सदस्य डॉ.विकास जामदार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
याप्रसंगी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की,”उज्वल भारत घडवण्यासाठी तरुणांनी जागृत होऊन व्यसनमुक्त व्हावे आणि देश हित साधावे असे आवाहन केले आहे.
सदर प्रसंगी प्रास्तविक प्राचार्य एन.जी.बारे यांनी केले त्यांनी,”सर्व उपस्थित विद्यार्थी,पालक व मान्यवरांचे स्वागत केले.अमृत महोत्सवी वर्षाचे महत्व अचूक शब्दात विद्यार्थ्यांना सांगितले आहे.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यामध्ये कुमारी गाढे अंजली,कुमारी सानप प्रीती, कुमारी पारखे गायत्री,कुमारी पेंढारी नेत्रा व कुमार वाघ गोकर्ण या विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून देशभिमान व्यक्त केला.
भारताच्या अमृत महोत्सवानिमित्त यावेळी महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा वकृत्व स्पर्धा व प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते.तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र चासनळी येथे व्यसनमुक्तीची. शपथ डॉ.मोरे यांनी दिली कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय शिक्षण समितीचे सदस्य विकास जामदार प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामभाऊ गाढे,संजय प्रभाकर चांदगुडे,कोकाटे सर पालक, ग्रामस्थ आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आभार प्राध्यापक ढेकळे,एस.पी.यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रणधीर ए.बी.यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.