कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या शाळेत विविध स्पर्धा संपन्न.

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
देशाचा ७५ वा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमीत्त कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने ब्राम्हणगाव येथील माध्यमिक शाळेत चित्रकला,निबंध आदी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आल्या होत्या.त्याला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा देशाला विसर पडला आहे.याच घडामोडी या माध्यमातून आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहेत.त्या अंतर्गत देशात विविध कार्यक्रम साजरे केले जात असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याने नुकत्याच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला,निबंध,वक्तृत्व स्पर्धा या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मीठाचा सत्याग्रह हा निर्णायक क्षणा पैकी एक आहे.याला दांडी यात्रा म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो.याच घटनेला ९१ वर्ष होत आहेत.याच वेळी देशाचा अमृत महोत्सवही साजरा केला जात आहे.स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असताना देशातील ७५ ठिकाणी स्वातंत्र्य लढ्यातील ७५ महत्वाच्या घटनांची आठवण केली जाणार आहे.स्वातंत्र्य लढ्यातील अनेक महत्वाच्या घडामोडींचा देशाला विसर पडला आहे.याच घडामोडी या माध्यमातून आजच्या पिढी समोर ठेवल्या जाणार आहेत.त्या अंतर्गत देशात विविध कार्यक्रम साजरे केले जात असून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याने नुकत्याच विद्यार्थ्यांसाठी चित्रकला,निबंध,वक्तृत्व स्पर्धा या विषयावर स्पर्धा घेण्यात आल्या आहेत.
सदर प्रसंगी श्री गवारे,श्री मेढे,संजय जाधव,मुख्याध्यापक पी.बी.आहेर,सचिव सोनवणे,फकिरा वाकचौरे,लहानु बनकर,आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आगामी स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रथम,व्दितीय,तृतीय व उत्तेजनार्थ बक्षीस वितरण करण्यात आले आहे.
त्यात लहान गट विजेते विद्यार्थी धाकतोडे ऋतुजा नवनाथ,माकूणे संस्कृती निवृत्ती दोन्ही इयत्ता सातवी,सोनवणे अस्मिता पांडुरंग इयत्ता पाचवी आदींचा समावेश आहे.तर मोठ्या गटात पगारे रेणुका बाळासाहेब,जगताप सिद्धी संजय दोन्ही इयत्ता नववी,लबडे राज बाबासाहेब इयत्ता दहावी आदींचा समावेश आहे.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष आहेर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विजय आसने यांनी मानले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती वंदना सोनवणे,श्रीमती निर्मला पवार,गोपाळ राजपूत आदींनी परिश्रम घेतले आहे.