शैक्षणिक
..या विद्यार्थ्यांची अमेरिकेतील विद्यापीठात शिक्षणासाठी निवड
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
संगणक अभियंता चि.समिरन जयंतराव जोशी अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक(सिटी) शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक शिक्षण आणि सेमी कंडक्टर यातील संशोधनासाठी रवाना होणार असंल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
समीरन जोशी याने युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात अभ्यासक्रम पुर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे.त्यांचे शिक्षण आणि संशोधन संपूर्ण खर्च मोफत होणार असून त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे.समीरणला सोबत २७०० डाॅलर (अंदाजे दोन लक्ष रुपये) दरमहा स्वतंत्र मिळणार आहे.येत्या १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे.
चि.समिरण जोशीच्या शालेय शिक्षण सेवा निकेतन येथे झाले आहे.तर महाविद्यालयीन शिक्षणात श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात शास्त्र शाखेच्या पदवी पर्यंत शिक्षण घेतले आहे.पुढे त्याने संगणक अभियांत्रिकी शिक्षण पुणे विद्यार्थी गृह घेतले.त्यानंतर कर्नाटक राज्याची राजधानी बेंगळुरू येथे ए.एम.डी.कंपनीत संगणक अभियंता म्हणून काम पहात होता.
मानवी जीवनात असामान्य क्रांती घडविणा-या संगणक युगात आपण पुढे जगाच्या पाठीवर संगणक क्षेत्रातील ज्ञान आणि संशोधन प्रक्रीयेत सहभागी व्हावे असे वाटून त्यादिशेने वाटचाल सुरु केली होती.
अमेरिका येथे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात साडेपाच वर्षांचा परम संगणक,सेमी कंडक्टर (हे संगणक नासा/ईस्रो वापरतात) या विषयावर संशोधनासाठी त्याची निवड झाली आहे.युटा विद्यापिठाचे तज्ञ प्राध्यापक व समितीव्दारे गुणी विद्यार्थींची निवड करत असतात.ही प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आणि कठोर पडताळणी द्वारे केली जाते.ही निवड प्रक्रिया सुमारे तीन महिने चालते.
समीरनचे संगणकाविषयी ज्ञान आणि संशोधक चिकित्सा पाहून त्याला अमेरिकेतील तिन विद्यापिठाने प्रवेशासाठी मागणी केली होती.त्याला अमेरिकेतील न्यूयॉर्क जवळील रटगर्स विद्यापीठ,शिकागो जवळील नाॅर्थवेस्टर्न विद्यापीठ आणि तिसरे युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठ यांचा समावेश होता.या तिनही विद्यापिठाने समीरणचा संपुर्ण शिक्षण आणि संशोधन खर्चाची तयारी दर्शवली.साडेपाच वर्षांचा समीरणचा खर्च सुमारे तीन कोटींच्या सुमारास आहे.
यात समीरणने युटा प्रांतात साॅल्टलेक शहरातील युटा विद्यापिठात अभ्यासक्रम पुर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे.त्यांचे शिक्षण आणि संशोधन संपूर्ण खर्च मोफत होणार असून त्याला शिष्यवृत्ती मिळाली आहे.समीरणला सोबत २७०० डाॅलर (अंदाजे दोन लक्ष रुपये) दरमहा स्वतंत्र मिळणार आहे.येत्या १६ ऑगस्टला समीरण अमेरिकेला रवाना होत आहे.
चि.समीरण हा श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे सेवेकरी,प्रसिद्ध विधीज्ञ कै.आत्माराम जोशी व श्रीमती पुष्पाताई जोशी यांचा नातू असून कोपरगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष ॲड.जयंत जोशी व ॲड.स्मीता जोशी यांचा जेष्ठ चिरंजीव आहे.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.