कोपरगाव तालुका
…या गावात वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव कोळपेवाडी येथील राधाबाई काळे कन्या विद्या मंदिर येथे वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा उत्साहात संपन्न झाला आहे.
पर्यावरणाचा समतोल व्यवस्थित राखण्यासाठी वृक्षांची संख्या कमी होऊन चालणार नाही. वृक्ष हे पर्यावरणातील खूप महत्वाचा भाग आहेत.आपल्या भोवताली असलेली झाडे आपल्याला फक्त सावली देत नाहीत तर वृक्षांपासून आपल्याला अनेक फायदे आहेत.वृक्ष वातावरणातील कार्बन डायऑक्साइड स्वतःकडे घेतात आणि जीवनावश्यक असा अक्सिजन आपल्याला देतात.त्यामुळे वृक्ष लागवड महत्वाची बाब बनली आहे.त्यामुळे राधाबाई काळे कन्या विद्यालयात वृक्षलागवड व वृक्ष दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
सदर वृक्षदिंडी ही विद्यालयापासून निघून कर्मवीर शंकरराव काळे स्मृति उद्यान येथे नेण्यात आली.विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींचे कोसाका उद्योग समूहातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले.उद्यानातील भव्य मैदानावर विद्यार्थिनींनी रिंगण करून टाळ मृदुंगाच्या जयघोषात ताल धरत छान नृत्य सादर केले.कोळपेवाडी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे,उपाध्यक्ष दिलीप बोरणारे,कार्यकारी संचालक सुनील कोल्हे आदींनी विद्यार्थिनींचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.त्यानंतर शालेय परिसरात शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कचरू पिराजी कोळपे,शालेय व्यवस्थापन विकास समितीचे उपाध्यक्ष बाळासाहेब ढोमसे,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका छाया काकडे,उपमुख्याध्यापक मधुकर गोडे,पर्यवेक्षक सुरेश खंडिजोड,ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख अंगद काकडे,गुरुकुल विभाग प्रमुख प्रभाकर आभाळे,वृक्षदिंडी प्रमुख स्मिता पाटील,हरित सेना प्रमुख राजेश वाघमारे,ज्येष्ठ शिक्षक बाळकृष्ण कोल्हे,ज्येष्ठ शिक्षिका अनिता पाटील व इतर शिक्षकांच्या हस्ते २५ कडुलिंब झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.विद्यार्थिनींना पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने वृक्ष संरक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव छाया काकडे यांनी यावेळी विद्यार्थिनींना करून दिले.या वृक्षदिंडी साठी इयत्ता पाचवी ‘क’ व सहावी ‘क’ च्या विद्यार्थिनी ह्या नऊवारी पोशाखात उपस्थित होत्या.
सदर वृक्षदिंडी चे आयोजन विद्यालयातील गुरुकुल प्रकल्प व हरितसेना अंतर्गत मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुल विभागाचे प्रमुख प्रभाकर आभाळे यांनी केले व यशस्वीतेसाठी उपशिक्षिका स्मिता पाटील यांनी केले व विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका पाटील अनिता व वसावे मंगला,देशमुख गणेश, वसावे सुमन,वसावे नरसिंग,लोहकरे मनोहर,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.आरोटे भाऊसाहेब,पवार नवनाथ,कुलकर्णी विक्रम,वैराळ सुनील,वैद्य प्रवीण आदींचे सहकार्य लाभले.