गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकास मारहाण,तिघांवर गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादिस आरोपी सागर अशीत घेगडे,कपिल अशीत घेगडे,सागर घेगडे यांचा भाऊ नाव माहिती नाही यांनी विलास वाबळे यांचे किराणा दुकानासमोर दि.१५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास पी.एस.एस.शाळेजवळ चौकात लाकडी व प्लास्टिक दांडा,फायटर आदींच्या सहाय्याने मारहाण गंभीर जखमी केल्याचा गुन्हा फिर्यादी संतोष उत्तम निकम (वय-३४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
फिर्यादी हा सुरेगाव येथील विलास वाबळे यांच्या दुकानासमोर उभा असताना आरोपी हे त्याठिकाणी आले व त्यांनी फिर्यादी निकम यास पी.एस.एस.शाळेजवळ चौकात लाकडी व प्लास्टिक दांडा,फायटर आदींच्या सहाय्याने मारहाण गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी संतोष उत्तम निकम (वय-३४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी संतोष निकम व प्रमुख आरोपी सागर घेगडे हे सुरेगाव या एकाच गावातील रहिवासी असून त्यांची आपसापसात ओळख आहे.दि.१५ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास फिर्यादी हा सुरेगाव येथील विलास वाबळे यांच्या दुकानासमोर उभा असताना आरोपी हे त्याठिकाणी आले व त्यांनी फिर्यादी निकम यास पी.एस.एस.शाळेजवळ चौकात लाकडी व प्लास्टिक दांडा,फायटर आदींच्या सहाय्याने मारहाण गंभीर जखमी केले असल्याचा गुन्हा फिर्यादी संतोष उत्तम निकम (वय-३४) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.मात्र या फिर्यादीत गुन्ह्यांचे कारण नेमके समजू शकले नाही.त्यामुळे पोलिसही चक्रावुंन गेले आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तीन आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.२७५/२०२२ भा.द.वि कलम ३२४,३४ प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव पोलीस नाईक व्ही.एन.कोकाटे आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.कोकाटे हे करीत आहेत.