निवडणूक
…या दोन सहकारी कारखान्याची निवडणूक बिनविरोध

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे व संजीवनी या दोन्ही सहकारी साखर कारखान्याची २०२२-२७ या पंचवार्षिक निवडणुक बिनविरोध जाहीर झाली असून यात एकवीस जागा बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले आहे.नूतन संचालकांचे माजी आ.अशोक काळे,आ.आशुतोष काळे,बिपीन कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.
“कर्मवीर शंकरराव काळे सहकारी कारखान्याची पार पडलेली निवडणूक प्रक्रिया लोकशाही पद्धतीने पार पडली असल्याचा दावा केला असून कारखाना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत असून घेत असलेल्या सभासद हिताच्या निर्णयामुळे उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ८८ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेवून निवडणूक बिनविरोध पार पाडली.त्यामुळे नक्कीच कारखान्याचे हित साधले जाणार आहे”-ना.आशुतोष काळे.
सहकार निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील २५ जिल्ह्यांमधील ८९ सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे आदेश काढले आहेत.त्यात सोलापूरसह मुंबई,सांगली,सातारा,कोल्हापूर,पुणे,परभणी,जालना,औरंगाबाद,नांदेड,बीड,उस्मानाबाद,लातूर,धुळे,यवतमाळ,बुलढाणा,अकोला, अमरावती,वाशिम,नागपूर,नंदूरबार,अ,नगर,नाशिक या जिल्ह्यांमधील सहकारी संस्थांचा समावेश आहे.त्यात कर्मवीर शंकरराव काळे, सहकारी कारखान्यासह संजीवनी सहकारी साखर कारखाण्याचा ही समावेश होता.
दरम्यान कोरोनामुळे या सहकारी संस्थांची मुदत संपूनही निवडणूक प्रक्रिया घेता आली नव्हती.आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून बहुतेक जिल्हे कोरोनामुक्त झाले होते त्यामुळे या निवडणुका जाहीर केल्या होत्या.त्या नुसार कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रम २० जून २०२२ पासून सुरू झाला होता.२० जून ते २४ जून या कालावधीत उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते.या कालावधीत अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे एकूण १०९ इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.
इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांपैकी पैकी ८८ उमेदवारांनी आपले अर्ज मुदतीच्या आत मागे घेतल्यामुळे एकूण २१ जागांसाठी २१ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे निवडणूक अधिकारी श्रीमती पल्लवी निर्मळ यांनी या उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले आहे.
यामध्ये सर्वसाधारण उत्पादक व्यक्ती सभासद माहेगाव देशमुख गट-माजी आ. अशोक शंकरराव काळे,आ.आशुतोष काळे,सूर्यभान बबनराव कोळपे हे बिनविरोध निवडून आले आहे.
मंजूर गट-सचिन दिलीप चांदगुडे,श्रीराम बळवंत राजेभोसले,अशोक कोंडाजी मवाळ आदींचा समावेश आहे.पोहेगाव गट-राहुल रमेश रोहमारे,प्रवीण जगन्नाथ शिंदे,राजेंद्र भागवतराव घुमरे आदींना संधी दिली आहे.चांदेकसारे गट -सुधाकर कोंडाजी रोहोम,दिलीप आनंदराव बोरनारे,शंकरराव गहीनाजी चव्हाण आदींना संधी दिली आहे.तर धामोरी गट-अनिल बाळासाहेब कदम,सुनील शिवाजी मांजरे,मनोज पुंडलिक जगझाप (माळी) आदींच्या गळ्यात हार अर्पण केला आहे.
याशिवाय उत्पादक सहकारी संस्था,बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था-वसंतराव (सुभाष) कचेश्वर आभाळे हे निवडून आले आहे.
अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती प्रतिनिधी– मच्छिंद्रनाथ रंगनाथ बर्डे यांना संधी दिली आहे.महिला राखीव प्रतिनिधी मतदार संघातून-वत्सलाबाई सुरेश जाधव तर इंदुबाई विष्णू शिंदे या निवडून आल्या आहेत. इतर मागास वर्ग प्रतिनिधी-दिनार पद्माकांत कुदळे यांच्या पुढील पिढीच्या गळ्यात हार अर्पण केला आहे.
भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग-शिवाजीराव माधव घुले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.बिनविरोध निवडणूक आणलेल्या नूतन संचालकांचे ना.आशुतोष काळे,बिपीन कोल्हे आदींनी अभिनंदन केले आहे.