कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील…या प्रादेशिक नळ योजनेला तांत्रिक मान्यता

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्याच्या जिरायती भागातील रांजणगाव देशमुखसह वेस-सोयगाव,धोंडेवाडी,बहादरपुर,अंजनापुर,मनेगाव या दुष्काळी सहा गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत ३५.९८ कोटी निधीस तांत्रिक मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
रांजणगाव देशमुख प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तत्कालीन युती शासनाने टँकर मुक्ती योजने अंतर्गत सन-१९९५ साली मंजुरी दिली होती.त्यानंतर हि योजना अनेक अडचणींचा सामना करत आहे.त्यामुळे अनेक गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते.त्यावरून अनेक वर्ष काळे-कोल्हे यांचा श्रेयवादाचा नाटकी सामना रंगला होता.मात्र हि योजना म्हणावी तशी चालली नाही.धारणगाव प्रादेशिक योजनेसारखी तिची गत झाली होती.पुढे हि योजना केवळ युती शासनाने मंजुरी केल्याने जसा,”पिंडाला कावळा शिवत नव्हता तसे तत्कालीन सन १९९९ व २००४ साली निवडून आलेले ईशान्य गडावरील राष्ट्रवादीचे नेते शिवत नव्हते” त्यामुळे ऐन पावसाळ्यात धोंडेवाडी सारख्या ग्रामपंचायतीना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत होते.
देशातील प्रत्येक घरात नळाने पाणीपुरवठा करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी केंद्र सरकारने जल जीवन अभियानाअंतर्गत २०२१-२२ या वर्षासाठी महाराष्ट्राला मिळणाऱ्या निधीत वाढ करुन तो निधी ७,०६४.४१ कोटी इतका वाढवला आहे.२०२०-२१ मध्ये हा निधी १८२८.९२ कोटी रुपये इतका होता.केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या निधीत चारपट वाढ करतांनाच २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरांत नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी राज्याला आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. वर्ष-२०२१-२२ साठी २५८४ कोटी रुपये निधी १५ व्या वित्त आयोगाने शिफारस केलेल्या अनुदान स्वरूपात महाराष्ट्राला देण्यात आला आहे त्यानुसार हि कामे घेण्यात आली असून त्यात समाविष्ट करण्यसाठी रांजणगाव देशमुख प्रादेशिक नळ योजनेचा समावेश होणार आहे.जल जीवन मिशनसाठी केंद्र व राज्य शासन प्रत्येकी ४५ टक्के आणि १० टक्के ग्रामपंचायत अंतर्गत निधी खर्च करण्यात येणार आहे.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दुष्काळी असलेल्या रांजणगाव देशमुख प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेला तत्कालीन युती शासनाने टँकर मुक्ती योजने अंतर्गत सन-१९९५ साली मंजुरी दिली होती.त्यानंतर हि योजना अनेक अडचणींचा सामना करत आहे.त्यामुळे अनेक गावांना पाण्यापासून वंचित राहावे लागत होते.त्यावरून अनेक वर्ष काळे-कोल्हे यांचा श्रेयवादाचा नाटकी सामना रंगला होता.मात्र हि योजना म्हणावी तशी चालली नाही.धारणगाव प्रादेशिक योजनेसारखी तिची गत झाली होती.पुढे हि योजना केवळ युती शासनाने मंजुरी केल्याने जसा,”पिंडाला कावळा शिवत नव्हता तसे तत्कालीन सन १९९९ व २००४ साली निवडून आलेले ईशान्य गडावरील राष्ट्रवादीचे नेते शिवत नव्हते” त्यामुळे ऐन पावसाळ्यात धोंडेवाडी सारख्या ग्रामपंचायतीना टॅंकरवर अवलंबून राहावे लागत होते.या योजनेचा असून अडचण नसून खोळंबा झाला होता.त्यावर अनेक वर्ष काथ्याकूट सुरु होता.मात्र यावर उपाय मात्र सापडत नव्हता.प्रत्येक निवडणुकीत या योजनेचा केवळ मतांसाठी निळवंडे सारखा वापर होत होता.मात्र आ.काळे हे निवडून आल्यावर या योजनेचे प्रलंबित काम मनावर घेतल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे.
त्यासाठी आ.काळे यांनी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून वारंवार बैठका घेतल्या असल्याचा दावा केला आहे.त्या पाठपुराव्यातून या रांजणगाव देशमुख पाणी पुरवठा योजनेसाठी ३५.९८ कोटीच्या निधीस तांत्रिक मंजुरी मिळविण्यात त्यांना यश मिळाले आहे.पुढील प्रशासकीय मंजूरी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरूच असून लवकरात लवकर प्रशासकीय मंजुरी देखील मिळवणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.रांजणगाव देशमुख सह परिसरातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.