जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
शैक्षणिक

कोपरगावात…या संस्थेकडून विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

सालाबादप्रमाणे याही वर्षी कोपरगाव शहरातील सनातन भारतीय संस्कृती संस्थेकडून नुकतेच नगरपालिका शाळा क्रमांक ३ या मुलींच्या शाळेत ३० गरजू मुलींना शाळेसाठी बॅगचे वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले आहे.या कार्याबद्दल नागरिकांनी कौतुक केले आहे.

सनातन संस्था ही भारतातील एक अध्यात्मिक हिंदू संस्था आहे, तिची स्थापना संमोहनतज्ज्ञ जयंत बाळाजी आठवले यांनी १९९९ साली केली. ह्या संस्थेच्या शाखा भारतात आणि भारताबाहेरही विस्तारलेल्या आहेत हि संस्था विविध समाजिक उपक्रम राबवत असते.त्यांच्या कोपरगाव शाखेने नुकताच शालेय विद्यार्थ्यांना शालेय दप्तर (बॅग) वाटप करण्यात आले आहे.

सनातन भारतीय संस्थेकडून फेब्रुवारी महिन्यात गरजू महिलांना साड्यांचे वाटप व मार्च महिन्यात शालेय मुलांना खाऊचे वाटप व गार पाण्याचे जार यांची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळी सनातनच्या साधिका लिलावती जमधडे,श्रीमती कल्पना सोनवणे या उपस्थित होत्या.

सदर प्रसंगी कोपरगाव नगरपरिषदेच्या शाळा नंबर ३ च्या मुख्याध्यापिका शोभा गाडेकर व शिक्षिका सरस्वती कानडे यांच्या हस्ते बॅगचे वाटप करण्यात आले आहे.सनातन भारतीय संस्कृती संस्था करत असलेल्या कार्याचे नागरिकांनीं कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close