विविध पक्ष आणि संघटना
“मुख्यमंत्री ठाकरे यांच्या बरोबर” त्यांची साथ सोडणार नाही-या नेत्याची माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
उत्तर नगर जिल्हा शिवसेना हि पक्षप्रमुख व राज्याचे वर्तमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबर असून त्यांची साथ सोडणार नाही अशी स्पष्टोक्ती शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी आमच्या प्रतिनिधी समवेत बोलताना दिली आहे.
दरम्यान त्यांना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या बाबत त्यांना विचारणा केली असता ते मतदार संघात असून यांचेशी तुम्ही संपर्क साधु शकता असे म्हटले आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने खा.लोखंडे यांचेशी संपर्क साधला असता ते ‘नॉट रीचेबल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे उलट-उलट चर्चेला उधाण आले आहे.
राज्यात शिव सेनेचे गटनेते व मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः बरोबर जवळपास ४२ आमदार घेऊन सुरत मार्गे गुवाहाटी गाठली आहे.त्यांनी शिवसेनेच्या आमदारांचे कामे होत नसल्याचा आरोप करत स्वतःच्या पक्ष प्रमुखांनाच दंडाच्या बेटकुळ्या दाखविण्यास सुरुवात केल्याने राज्यातील सरकार अस्थिर झाले असून मोठा पेच निर्माण झाला आहे.या राजकीय परिस्थितीमुळे सरकार अस्थिर झाले आहे.नुकताच काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडला.यातचं आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘शिवसेनेतील बंडखोर आमदार २४ तासांमध्ये मुंबईत आल्यास शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा विचार करेल’, असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.तर मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःचा गट हाच खरी शिवसेना आहे.हा दावा निवडणूक आयोगाकडे करण्याचा प्रयत्न सुरु केल्याने राज्यात त्यामुळे दिवसेंदिवस राज्यातील पेच वाढत चालला आहे.या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने शिवसेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनी हि भूमिका स्पष्ट केली आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,”शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जीवाचे रान करून शिवसेना उभी केली आहे.त्यांच्या बरोबर आम्ही तेंव्हाही होतो व आजही तितक्याच ताकतीने उभे राहणार आहे.राज्यातील पेच लवकरच मिटेल असा आशावादही त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
दरम्यान या प्रकरणी शिवसेनेचे तालुका अध्यक्ष शिवाजी ठाकरे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी म्हटले आहे की,”आम्ही अद्याप थांबा आणि पहा’ या भूमिकेत आहे”कारण अद्याप ते मुंबईत आलेले नाही.व शिंदे यांनी अद्याप शिवसेना सोडली असा दावा केलेला नाही.त्यांनी अद्याप आम्ही शिवसेनेत असल्याचे म्हटले आहे.त्यामुळे अद्याप त्यांनी बंड केले असल्याचे म्हटले नाही.त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी लवकरच मुंबईत येतील व पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचेशी चर्चा करून ‘हा’ वाद मिटवतील असा आशावाद व्यक्त केला आहे.ई.डी.च्या चौकशीच्या भीतीने हा प्रसंग आला असल्याचा त्यांनी दावा केला आहे.व आम्ही यापुढे हि सेनेत राहणार आहे.आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या आता कोठे गेले आहे ? त्यांना कोठे गायब केले आहे ? असा सवाल त्यांनी विचारला आहे.यशवंत जाधव आणि यामिनी जाधव या भाजपात जाऊन पवित्र होणार होते का ? त्यांच्या संपत्तीची जप्ती भाजप करेल का ? असा तिरकस सवाल त्यांनी विचारला आहे.पक्षप्रमुख आमचे देव आहेत.त्यांचे व पक्षाचे काम आगामी काळातही करत राहणार आहे”असे त्यांनी शेवटी म्हटलं आहे.
दरम्यान त्यांना शिर्डी लोकसभा मतदार संघाचे खा.सदाशिव लोखंडे यांच्या बाबत त्यांना विचारणा केली असता ते मतदार संघात असून यांचेशी तुम्ही संपर्क साधु शकता असे म्हटले आहे.या बाबत आमच्या प्रतिनिधीने खा.लोखंडे यांचेशी संपर्क साधला असता ते ‘नॉट रीचेबल’ असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे उलट-उलट चर्चेला उधाण आले आहे.