निवड
जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी…या शिक्षक नेत्यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
अ.’नगर जिल्हा प्राथमिक शिक्षकसंघाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोपरगावचे शिक्षक नेते ज्ञानेश्वर माळवे यांची राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांनी निवड केली आहे.त्यांच्या निवडीचे नगर जिल्ह्यात सर्वत्र स्वागत होत आहे.
ज्ञानेश्वर माळवे यांनी शिक्षक संघ व सदिच्छा मंडळातील कामकाज,शिक्षकांचे प्रश्न सोडवणे,धडाडी,निर्भिडपणा व नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे या बाबींची दखल घेऊन माळवे यांची निवड करण्यात आली असल्याचे मानले जात आहे.
ज्ञानेश्वर माळवे यांनी शिक्षक संघ व सदिच्छा मंडळातील कामकाज,शिक्षकांचे प्रश्न सोडवणे,धडाडी,निर्भिडपणा व नगर जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणे या बाबींची दखल घेऊन माळवे यांची निवड करण्यात आली असल्याचे मानले जात आहे. यासंबधी जिल्हा सदिच्छा मंडळाचे शिक्षक नेते राजेंद्र शिंदे,रविंद्र पिंपळे,संघाचे नगर जिल्हाध्यक्ष माधव हासे,सदिच्छा मंडळाचे जिल्हाध्यक्ष नारायण राऊत,उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष गजानन ढवळे,कैलास वर्पे व जामखेडचे बाळासाहेब मोरे यांनी कोपरगांवला येऊन ज्ञानेश्वर माळवे यांना पत्र दिले व सत्कार केला आहे.राज्याध्यक्ष राजाराम वरुटे याच्याशी भ्रमणध्वनीवरुन राजेंद्र शिंदे यांमी बोलणे करुन दिले.वरुटे यांनी माळवे यांचे अभिनंदन केले आहे. सर्व सदिच्छा प्रेमी शिक्षकांनी व माळवे यांचे अभिनंदन केले आहे.