गुन्हे विषयक
उसन्या पैशावरून मारहाण,कोपरगावात गुन्हा दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कासली ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर एकनाथ दाणे (वय-३०) यांना उसन्या पैशावरून आरोपी सोमनाथ रामकृष्ण भागवत,विशाल नामदेव भागवत व साईनाथ भागवत आदींनी लाठीकाठीने मारहाण केली असल्याची फिर्याद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी नोंदवली आहे.
फिर्यादी हे कासली येथील रहिवासी असून त्यांचा व आरोपींचा उसन्या पैशावरून वाद आहेत.त्यावरून रविवार दि.१२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आरोपी सोमनाथ भागवत व विशाल भागवत आणि साईनाथ भागवत यांचा वाद आहे.वरील तारखेस शिरसगाव येथील इलेक्टरीक दुकानांचे समोर आरोपीं सोमनाथ भागवत याने शिविगाळ करून हाताने फिर्यादीचे तोंडावर मारले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी हे कासली येथील रहिवासी असून त्यांचा व आरोपींचा उसन्या पैशावरून वाद आहेत.त्यावरून रविवार दि.१२ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास आरोपी सोमनाथ भागवत व विशाल भागवत आणि साईनाथ भागवत यांचा वाद आहे.वरील तारखेस शिरसगाव येथील इलेक्टरीक दुकानांचे समोर आरोपीं सोमनाथ भागवत याने शिविगाळ करून हाताने फिर्यादीचे तोंडावर मारले आहे.
आरोपी विशाल भागवत याने फिर्यादिस खाली पाडून तसेच आरोपी साईनाथ भागवत याने हातातील काठीने फिर्यादीच्या पाठीवर पायावर गुडघ्यावर मारहाण करून दुखापत केली आहे.व आरोपीं सोमनाथ भागवत याने फिर्यादिस जीवे मारण्याची धमकी दिली आहे.सदरचा गुन्हा फिर्यादी यांनी दि.१३ जून रोजी सायंकाळी ०५ वाजेच्या सुमारास दाखल केला आहे.
दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी गंभीर दखल घेऊन घटनास्थळी भेट दिली आहे.