वन व पर्यावरण
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त…या गावात रक्तदान शिबिर

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत जागतिक पर्यावरण दीना निमित्त श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण कुंभारी व संजीवनी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर व, वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी जगभर ५ जून रोजी साजरा केला जातो आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी जागरूकता आणि कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख साधन आहे.१९७३ मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आलेले ते सागरी प्रदूषण,जास्त लोकसंख्या,ग्लोबल वॉर्मिंग,शाश्वत उपभोग आणि वन्यजीव गुन्हेगारी यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर जागरूकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ मानले जात आहे.त्या दिनाचे औचित्य साधत कुंभारी येथे हा दिन उत्साहात संपन्न झाला आहे.
सदर प्रसंगी राघवेशवर देवस्थानचे राघवेशवर नदंगिरी महाराज यांचा हस्ते साईबाबांच्या प्रतीमा पुजेन करून कार्यक्रमला सुरूवात केली.लोकनियुक्त सरपंच तसेच साई राघवेशवर प्रतिष्ठाण अध्यक्ष प्रशांत घुले,उपाध्यक्ष वाल्मिक निळकंठ,प्रतिष्ठाणचे सचिव श्रीकांत पैठणे श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण चे सर्व सदस्य संतोष कदम,दिलीप ठाणगे,जयवंत बढे,सिद्धांत घुले,अतुल निळकंठ,राजेंद निळकंठ,सुनील वाघ,अमोल ठाणगे,संदेश घुले,अमोल कोकाटे,संदिप निळकंठ,संतोष वाघ,रमण घुले,शिवराज निळकंठ,संतोष कदम,अनिल घुले,पपु डांगे व ग्रामपंचायत सदस्य ललित निळकंठ,वसंतराव घुले,शिवाजीराव घुले,अर्जून घुले,विजयराव कारभारी कदम,शिवाजी थोरात,सुदाम घुले,प्रकाश राजगुरू,राजगुरू ताई,पंढरीनाथ कदम,संजय बढे,विलास वाघ,भगवान खळे,विकास वाघ,साई जाधव,नाना शेजवळ,दिलीप गायकवाड आदी मान्यवर हजर होते.
सर्व ब्लड बँकचे डाॕ.निता पाटील,डाॕ.कविता चोधरी,सुररया पठाण,रेणुका जावळे,उस्मान शेख, विराज गायकवाड,सनी धिवर,देविका गायकवाड,वैष्णवी सोनवणे,पंचशिला साळवे,वृशाली जाधव आदीं मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक कार्यक्रम सुशांत घोडगे यांनी केले.लोकनियुक्त सरपंच प्रशांत घुले यांनी ग्रामस्थांना वृक्षारोपण साठी केलेल्या भरीव योगदान विषयी उपस्थितांना माहिती दिली तसेच जवळपास १५ लोकांनी रक्तदान केले व त्यांच्या हस्ते वृक्षचे वृक्ष रोपण करण्यात आले आहे.यात वड,नागपुष्प,पिपंळ,चिंच,जाबुंळ,उंबर,कांचन,आवळा आदींचा समावेश आहे.
सदर प्रसंगी श्री साई राघवेशवर प्रतिष्ठाण कुंभारीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मान केला आहे.उपस्थितांचे वाल्मिक निळकंठ यांनी उपस्थितांचे आभार मानले आहे.