करमणूक
कोपरगावात सोनी टी.व्ही संचलीत ‘कोण होणार करोडपती’

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगावात प्रथमच सोनी मराठी वरील कोण होणार करोडपती या सुप्रसिद्ध शो मध्ये थेट प्रेक्षक म्हणून सहभाग घेता येणार यासाठी सोनी मराठी चॅनलच्या या चमुने कोपरगावातील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
“कोण होईल मराठी करोडपती ? हा ई टीव्ही मराठी वाहिनीवर सादर झालेला एक गेम शो आहे.सोनी हिंदी वाहिनीवर कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेमुळे याचे मराठीमध्ये रुपांतर करण्यात आले. याचे तीन पर्वे कलर्स मराठी वाहिनी आणि नंतरची पर्वे सोनी मराठी वाहिनीवर प्रदर्शित करण्यात आली होती.या कार्यक्रमाचे सचिन खेडेकर,स्वप्नील जोशी आणि नागराज मंजुळे यांनी विविध पर्वात सूत्रसंचालन केले होते.कोपरगावात तो संपन्न झाला आहे.
सदर कार्यक्रम पहाण्यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडीयमसह अनेक विदयालयातील शिक्षक,विद्यार्थ्यां,नागरिक उपस्थित होते.सोनी मराठी कडून आयोजित या कार्यक्रमात कोपरगावतील दहा व्यक्तींचा मुंबई येथे होणाऱ्या “कोण होणार करोडपती” या टाॕक शो साठी प्रेक्षक म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सचिन खेडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम बघण्यासाठी निवड करण्यात आली आहे.
या दहा विजेत्यांमध्ये ठोळे उद्योग समुहाचे कैलास ठोळे,सपना जाधव,निवृत्त माजी मुख्याध्यापक चंदुलाल बजाज,डॉ.सोनिया रणदिवे,कला शिक्षक अतुल कोताडे,साहीत्य परीषदेचे सुधीर (राजेंद्र) कोयटे,संत ज्ञानेश्वर इंग्लिश मेडीयमच्या प्रियंका सोनवणे,दिलीप तुपसैंदर,नितीन जाधव,विजय कासलीवाल यांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देत टाॕक शो मध्ये जाण्यासाठी “गोल्डन पास” प्राप्त केला.विजेत्यांना सोनी टी.व्ही तर्फे भेटवस्तू देण्यात आल्या.या कार्यक्रमाचे आयोजन कोपरगावात प्रथमच केल्याबद्दल सोनी मराठीच्या टीमने स्वच्छतादूत सुशांत घोडके, निवेदक श्रीकांत बागुल तसेच विदयालयांचे मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांचे आभार मानले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी मराठीचे आर.जे.श्रीकांत यांनी केले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.या वेळी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,चेअरमन चंद्रकांत ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,संदीप अजमेरे,विशाल झावरे,विवेक सोनवणे,उपमुख्याध्यापक आर.बी.गायकवाड,जेष्ठ शिक्षिका रायते यु.एस,सौ. मोनाली निंबाळकर,पल्लवी तुपसौंदर,उमाताई रायते मॅडम,संत ज्ञानेश्वरचे मुख्याध्यापक सचिन मोरे,सहशिक्षिका वसुधा झावरे,प्रियांका शेलार,सोनाली हुळेकर,स्वाती गहिरे,सहशिक्षक अनुप गिरमे यांचे सह श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय आणि संत ज्ञानेश्वर स्कूलचे शिक्षक,नागरिक उपस्थित होते.