कोपरगाव तालुका
कोपरगावातील…या मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉकचे काम पूर्ण

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका दीपा वैभव गिरमे यांच्या प्रयत्नातून ओमनगर या उपनगरातील गणेश दत्त मंदिर परिसरात नुकतेच कोपरगावनगर परिषदेच्या वतीने पेव्हिंग ब्लॉकचे सुशोभीकरण नुकतेच करण्यात आले आहे त्याचे भाविकांनी स्वागत केले आहे.
“कोपरगाव नगरपरिषदेच्या हद्दीतील प्रभाग दोनच्या हद्दीत असलेल्या ओमनगर येथील गणेश-दत्त मंदिर परिसराचा विकास करणे गरजेचे होते त्यासाठी नागरिक व भाविकांची तशी मागणी होती.त्यासाठी आपण पालिकेकडे मागणी केली होती त्यास नगराध्यक्ष विजय वहाडणे,मुख्याधिकारी शांताराम गोसावी आदींची सहकार्य केले असल्याने हा प्रकल्प राबविणे सोपे गेले आहे”-दीपा गिरमे,माजी नगरसेविका,कोपरगाव नगरपरिषद.
कोपरगाव नगरपरिषदेच्या माजी नगरसेविका गिरमे यांनी आपल्या काळात अनेक विकास कामे नगराध्यक्ष विजय वहाडणे व मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्या सहाय्याने राबविली आहे.त्यामुळे या प्रभागाचा चेहरा-मोहरा बदलला आहे.त्यासाठी त्यांना त्यांचे सहकारी नगरसेवक जनार्दन कदम,त्यांचे नेते नगरसेवक,त्यांचे पती व भाजप नेते वैभव गिरमे आदींचे सहकार्य लाभले असल्याचे म्हटले आहे.
या उपक्रमाबद्दल व गणेश दत्त मंदिर परिसराचे सुशोभीकरण केल्याबद्दल नगरपरिषदेचे व नगरसेविका दीपा गिरमे,वैभव गिरमे यांचे गणेश-दत्त मंदिर व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले आहे.