पुरस्कार,गौरव
सोमैय्या महाविद्यालयाच्या…या विद्यार्थ्यांनी पटकावला वाद-विवाद करंडक

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील स्थानिक के.जे.सोमैया वरिष्ठ व के.बी.रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी योगेन्द्र मुळे व कु.आदिती देशमुख यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय,लोणी खुर्द येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सांघिक फिरता रौप्य करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये २ हजार १०० रुपये तसेच योगेंद्र मुळे याने रुपये ०५ हजार ००१ रुपया,स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे वैयक्तिक द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खोवला आहे अशी माहिती प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी येथे दिली आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव अॅड संजीव कुलकर्णी व विश्वस्त संदीप रोहमारे यांनी विशेष अभिनंदन केले आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,वादविवाद मंडळाचे प्रमुख डॉ.जिभाऊ मोरे,डॉ.गणेश देशमुख आदी प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले होते.