गुन्हे विषयक
कोपरगावात तरुणाची आत्महत्या,अकस्मात मृत्यूची नोंद

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील बैलबाजार रस्त्यालागत राहवासी असलेला तरुण ईश्वर भाऊसाहेब कुऱ्हाडे (वय २६) याने अज्ञात कारणाने आपल्या घरात पत्र्याचे लोखंडी अँगलला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली इहलोकीची यात्रा संपवली आहे.त्याच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही.दरम्यान या प्रकरणी तेथील वकील नितीन भास्कर गंगावणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान या प्रकरणी तेथील वकील नितीन भास्कर गंगावणे यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.हि घटना सोमवार दि.०९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास मयत तरुण ईश्वर कऱ्हाडे याचाच घरात घडली आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी अकस्मात मृत्यू नोंद क्रं.३३/२०२२ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे नोंदणी केली आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.डी. आर.तिकोणे हे करीत आहेत.