गुन्हे विषयक
जमीन वाटण्याच्या कारणावरून मारहाण,कोपरगावात तिघांवर गुन्हा

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील पढेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेल्या फिर्यादिस त्याच गावातील आरोपी शोभा मोहन पवार,साईनाथ मोहन पवार,राहुल मोहन पवार आदींनी,” गायरानाची जमीन वाटून का देत नाही” असा जाबसाल करत दि.०९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीचे घरासमोर काठी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद पोपट कचरू पवार (वय-६५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पढेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.
पढेगावातील आरोपी शोभा मोहन पवार,साईनाथ मोहन पवार,राहुल मोहन पवार आदीं फिर्यादीच्या घरासमोर गेले व त्यांनी फिर्यादी पोपट पवार यास म्हणाले की,”तुला मिळालेली गायरानाची जमीन वाटून का देत नाही” असा जाबसाल करत दि.०९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीचे घरासमोर काठी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी पोपट पवार व आरोपी शोभा पवार हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.त्यांच्यात गायरान जमीन वाटाण्याच्या कारणावरून बरेच महिन्यापासून वाद आहेत.ते वाद समोचाराने सुटले नाही.त्यावरून दोन्ही कुटुंबात वाद आहेत.त्यावरून अनेक वेळा वादावादी झालेली आहे.मात्र त्याचे पर्यावसान सोमवार दि.०९ मे रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास हाणामारीत झाले आहे.
आरोपी शोभा मोहन पवार,साईनाथ मोहन पवार,राहुल मोहन पवार आदीं फिर्यादीच्या घरासमोर गेले व त्यांनी फिर्यादी पोपट पवार यास म्हणाले की,”तुला मिळालेली गायरानाची जमीन वाटून का देत नाही” असा जाबसाल करत दि.०९ मे रोजी रात्री ०८.३० वाजेच्या सुमारास फिर्यादीचे घरासमोर काठी लाथा बुक्क्यांनी मारहाण केली असल्याची फिर्याद पोपट कचरू पवार (वय-६५) कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने पढेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने यांनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी फिर्यादी पोपट पवार याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध गुन्हा क्रं.१७२/२०२२ भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ए.व्ही.गवसने हे करीत आहेत.